Novak Djokovic with mother Sakal
क्रीडा

'कोर्टातील' विजय अधिक रोमांचक; जोकोविचच्या आईची प्रतिक्रिया

सुशांत जाधव

मेलबर्न : वर्षातील पहिली वहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेपूर्वी जोकोविचला न्यायालयीन कोर्टात जावे लागले. ऑस्ट्रेलियन सरकारविरोधात जोकोविचनं (Novak Djokovic) उचलेले पाऊल यशस्वीही ठरले. स्थानिक न्यायालयाने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावरील ठपका अयोग्य असल्याचे घोषीत करत ऑस्ट्रेलियन (Australian Government) सरकारला फटकारले. याप्रकरणात न्यायालयाने जोकोविचला तात्काळ सोडण्याचे आणि त्याचा व्हिसा परत देण्याचे आदेश दिले.

कोर्टाच्या या निर्णयानंतर आता जोकोविचची आई डायजना जोकोविच (Dijana Djokovic) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जोकोविचने त्याच्या टेनिस कारकिर्दीत मिळवलेल्या सर्व ग्रँडस्लॅम विजयापेक्षा कोर्टाने त्याच्या बाजूने दिलेला निर्णय ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याआधी जोकोविचच्या आईनं ऑस्ट्रेलियात मुलाला कैद्याप्रमाणे वागवले जात असल्याचा आरोप केला होता. व्हिसा रद्द करुन पासपोर्ट अधिकाऱ्यांनी जोकोविचला क्वारंटाईन केले होते. त्याला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले ते ठिकाण एखाद्या गुन्हेगाराला शिक्षेसाठी ठेवावे, असेही त्या म्हणाल्या होत्या.

जोकोविचनंही न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. व्हिसा रद्द केल्याप्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकार आहे. अजूनही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्याची आशा कायम आहे, असे जोकोविचनं म्हटलं आहे. जोकोविचनं कोरोनाप्रतिबंधक लस घेतली नसल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळता येणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र ऑस्ट्रेलियन ओपन आयोजकांनी त्याला यात सूट दिली होती.

लस न घेण्यामागचे मेडिकल कारण आणि त्याचे पुरावे सादर करुन जोकोविचला स्पर्धेत सहभागी होता येईल, असे समोर आले. पण दरम्यान स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होताच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. जोकोविचने ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि तो जिंकलाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT