Ind vs Pak Asia Cup avesh khan sakal
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का

रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर भारताच्या अडचणीत आणखी वाढ टीम इंडियाचा आणखी एक स्टार खेळाडू आजारी.

Kiran Mahanavar

India Vs Pakistan Asia Cup Avesh Khan : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज आवेश खान पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. याआधी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने आवेश खान या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती दिली.

भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रशिक्षक द्रविडने पत्रकार परिषदेत आवेश खानची प्रकृती ठीक नसल्याचे राहुल द्रविडने सांगितले. राहुल द्रविड म्हणाला, आवेश खानची तब्येत ठीक नाही. त्याला थोडा ताप आला आहे. डॉक्टर आवेश खानची काळजी घेत आहे. आवेश खान सराव सत्रात सहभागी झाला नाही. आम्हाला आशा आहे की ही गंभीर बाब नाही. आवेश खान उर्वरित स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याची आम्हाला आशा आहे.

आवेश खान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर असल्याचा दावा याआधी मीडिया रिपोर्ट्समध्येही करण्यात आला होता. आवेश खान दोन दिवसांपासून मैदानावर सरावासाठी आला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनीही आवेश खान पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्याच्या स्थितीत नसल्याची पुष्टी केली आहे. आवेश खानला वगळल्यामुळे टीम इंडियाचे वेगवान गोलंदाजी आक्रमण कमकुवत झाले आहे. भारताने आशिया चषकासाठी केवळ तीन वेगवान गोलंदाजांच्या जागी टीम इंडियाला संधी दिली होती. आता प्लेइंग 11 मध्ये आवेश खानच्या जागी आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते.

आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत रविवारी टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग संघाचा 40 धावांनी पराभव केला. आता सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबरला सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वंजारी समाज आक्रमक; गृहमंत्र्यांकडे 302 अंतर्गत गुन्ह्याची मागणी

मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? एक्स बॉयफ्रेंडने दिलेल्या खास पद्धतीने शुभेच्छा, म्हणाला...'नेहमी तु अशीच...'

Satara Doctor Case : चार वेळा बलात्कार करुन छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन, साताऱ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT