Babar Azam  esakal
क्रीडा

Babar Azam : तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय... बाबरचे चॅट सार्वजनिक झाल्यावर माजी प्रशिक्षक जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam : पाकिस्तानने जेव्हापासून भारताविरूद्धचा वर्ल्डकप सामना गमवाला आहे. तेव्हापासून त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट सरळ होत नाहीये. पाकिस्तान संघात वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता बाबर आझमचे पीसीबी चेअरमनसोबतचे व्हॉट्स अॅप चॅट सार्वजनिक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यावरून आता पीसीबीवर मोठी टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक वकार युनिस तर या चॅट लीक प्रकरणावर जाम भडकला. त्यात हे चॅट पाकिस्तान लाईव्ह टीव्हीवरून प्रसिद्ध करण्यात आलं. यावरून पाकिस्तान संघ व्यवस्थापन आणि बाबर आझम यांच्यात सध्या तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येते. वकारने बाबर आझमच्या समर्थनात ट्विट केले.

'हे काय करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही लोकं?? हे खूप लाजीरवाणं आहे. तुम्ही लोकं आनंदी झाला असाल. कृपा करून बाबर आझमला एकटं सोडा. तो पाकिस्तान क्रिकेटसाठी एक संपत्ती आहे.'

एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवरील मुलाखतीत पीसीबी चेअरमन झाका अश्रफ यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. अश्रफ यांनी सांगितले की बाबर आझम हा थेट माझ्याशी कधीच संपर्कात नव्हता. तो म्हणतोय की मी त्याचा फोन उचलत नाही. त्याने मला कधी कॉल केला नाही. प्रमुख कार्यकारी अधिकारी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक हे संघाच्या कर्णधारासोबत थेट बोलणे अपेक्षित आहे.'

आपल्या बोलण्याचा पुरावा म्हणून त्यांनी थेट बाबर आझम सोबतचे वैयक्तिक चॅट लीक केले.

पाकिस्तानचा पुढचा सामना बांगलादेश सोबत

पाकिस्तान सध्या वर्ल्डकपमध्ये खराब स्थितीत आहे. बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला पाठोपाठ पराभव सहन करावे लागले आहे. त्यांना सध्या विजयाची नितांत गरज आहे. त्यांचा पुढचा सामना हा बांगलादेश सोबत होत आहे. हा सामना ऐतिहासिक अशा एडन गार्डनवर होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT