pv sindhu enters semifinals of india open badminton tournament  Sakal
क्रीडा

India Open 2022 : 36 मिनिटांत खेळ खल्लास; सिंधूनं गाठली सेमी

सुशांत जाधव

भारताची स्टार शटलर आणि सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूनं India Open 2022 स्पर्धेची सेमी फायनल गाठली आहे. महिला एकेरी गटात सिंधूनं (PV Sindhu ) भारतीय अश्मिता चलिहा हिला 21-7, 21-18 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अवघ्या 36 मिनिटात तिने क्वार्टर फायनल गेम संपवली. (India Open 2022 PV Sindhu Enters Semifinals Of India Open Badminton Tournament)

सिंधूने 21 वर्षीय अश्मिताचा निभावच लागू दिला नाही. आता सेमी फायनलमध्ये तिची लढत थायलँडच्या सहाव्या मानांकित सुपानिदा कातेथोंग हिच्याविरुद्ध रंगणार आहे. कातेथोंग हिला क्वार्टर फायनलमध्ये वॉकओवर मिळाला होता. तिसऱ्या क्रमांकाची मानांकित सिंगापुरची यीयो जिया मिन हिने तापानं फणफणत असल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे कोतेथोंग थेट सेमी फायनल खेळताना दिसेल.

सिंधू आणि अश्मिता यांच्यात याआधी 2019 मध्ये 83 व्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. आसामच्या अश्मिताने त्यावेळी जबदस्त कामगिरी करुन दाखवली होती. इंडिया ओपनच्या क्वार्टर फायनलमध्येही दुसऱ्या सेटमध्ये तिने सिंधूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूनं बाजी मारली.

सलामीलाच सिंधूनं 11-5 अशी आघाडी घेतली होती. आक्रमक खेळीनं अश्मिताला तिने बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या सेटमध्ये अश्मिताने 9-9 गुणांपर्यंत बरोबरी केली. त्यानंतर सिंधूनं 15-11 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अश्मिताने पुन्हा सलग चार पॉइंट्स घेत सेट 15-15 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सिंधू विजयी पॉइंट्स घेऊनच थांबली.

महिला एकेरीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आकर्षी कश्यपची लढत थायलँडच्या बुसानन ओंग्बारुंगफान हिच्या विरुद्ध रंगणार आहे. क्वार्टर फायनलमध्ये आकर्षीनं सायना नेहवालला पराभूत करुन स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद असल्याचे दाखवून दिलेल्या मालविका बनसोवडेला 21-12, 21-15 असे पराभूत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Tanker Fire : प्रवासी बस अन् एलपीजी गॅस टँकरची समोरासमोर भीषण धडक; १० जणांचा होरपळून मृत्यू, २७ प्रवासी गंभीर जखमी

Torrent Project: टोरंट कंपनीला 730 एकर जमीन खरेदी करण्यास राज्य सरकारची मंजुरी; कर्जतच्या प्रकल्पामुळे वाद वाढणार

Marathi News Live Updates : बीडमध्ये पोलिस कॉन्स्टेबल बेपत्ता

Travis Head: १९ नोव्हेंबरचा तो काळा दिवस भारतीय चाहते विसरले नाहीत; ट्रेव्हिस हेडने ३ वर्षांनंतर पोस्ट करत पुन्हा आठवण करून दिली

Lakshmi Narayan Yog 2026: अडकलेला पैसा मिळणार, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलणार! तुळशी विवाहानंतर ५ राशींसाठी लक्ष्मी नारायण योग ठरणार शुभ

SCROLL FOR NEXT