Saina Nehwal and Siddharth
Saina Nehwal and Siddharth Team eSakal
क्रीडा

'Its Ok, पण महिलांना...' सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायनाची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेवरून भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने चिंता व्यक्त केली होती. यावर अभिनेता सिध्दार्थने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. आता या प्रकरणी सिध्दार्थने (Actor Siddharth) सायना नेहवालची ट्विटरवरून माफी मागितली आहे. सिद्धार्थने माफी मागितल्यानंतर आता सायना नेहवालनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ आधी माझ्याबद्दल काहीतरी बोलला आणि नंतर त्यानं माफी मागितली. ही गोष्ट एवढी व्हायरल का झाली हे मलाही कळत नाही. मला स्वतःला ट्विटरवर ट्रेंड करताना पाहून आश्चर्य वाटलं. तरी सिद्धार्थने माफी मागितल्याने आनंद झाला. तुम्ही अशा पद्धतीनं महिलांना टार्गेट करू नका. पण ठीक आहे. मला त्याची पर्वा नाही. मी माझी आनंदात आहे. देव त्याला आशीर्वाद देवो. असं सायना नेहवाल म्हणाली आहे.

सायनाने ट्विटरवर लिहिलं होतं की, देशाचे पंतप्रधान सुरक्षित नसतील तर कोणताच देश आपण सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मोदींच्या सुरक्षेबाबतीत झालेल्या या घटनेचा निषेध करते असे सायना म्हणाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT