Virat Kohli Asia cup  esakal
क्रीडा

Asia Cup : विराट संघात परतला मात्र जसप्रीत आशिया कपला मुकणार

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : बीसीसीआयने नुकताच आशिया कपसाठी संघ जाहीर केला. संघात धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीचे (Virat Kohli) पुनरागमन झाले आहे. भारतीय संघातील वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया कप टी 20 स्पर्धेला (Asia Cup 2022) मुकणार आहे. त्याला पाठीच्या दुखण्यातून (Back Injury) तो अजून सावरला नसल्याने तो आशिया कप खेळणार नाही. भारताचा आशिया कपसाठीचा संघ आज (सोमवारी) निवडण्यात आला. विराट कोहलीबरोबरच केएल राहुलनेही भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तो मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्याला मुकला होता.

आशिया कपसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.

आशिया कपसाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले असले तरी काही युवा खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने अर्धदीप सिंग आणि आवेश खान यांना संघात स्थान मिळाले आहे. या दोघांकडे आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्याची नामी संधी आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली. 'जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्याने सतावले आहे. त्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळणार नाही. तो आमच्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे तो टी 20 वर्ल्डकपपूर्वी संघात परतण्याची शक्यता आहे. आम्ही आशिया कपमध्ये त्याच्या बाबतीत जोखीम घेऊ शकत नाही. आशिया कपमध्ये त्याला खेळवले तर त्याची दुखापत वाढू देखील शकते.' असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जसप्रीत बुमराह शेवटचा वनडे सामना इंग्लंड विरूद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याला वेस्ट इंडीज आणि आगामी झिम्बावे दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे. आता त्याला पाठीच्या दुखण्यामुळे अजून काही काळ संघापासून दूर रहावे लागणार आहे. पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. तो सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकत संघात पुनरागमन करू शकतो.

जसप्रीत बुमराह सध्या कुटुंबासोबत अमेरिकेत आहे. बुमराहची पाठदुखी भारताची डोकेदुखी ठरू शकते. कारण दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला काही सामन्यांचा सराव आवश्यक आहे. तो जवळपास दोन महिने मर्यादित षटकांचा सामना खेळणार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT