WPL 2023 Date Schedule esakal
क्रीडा

WPL 2023 Date : महिला प्रीमियर लीगची तारीख ठरली! गुजरात नाही तर मुंबईत होणार पहिला हंगाम

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2023 Date Schedule : बीसीसीआयच्या महिला प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) पहिल्या हंगामाचा श्रीगणेशा कधी करायचा याची तारीख ठरली आहे. बहुप्रतिक्षित WPL चा पहिला हंगाम हा 4 मार्च ते 26 मार्च यादरम्यान होणार आहे.

महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आयोजित करण्याचा मान हा मुंबईला मिळणार आहे. हंगामातील पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींच्या संघात होण्याची शक्यता आहे.

आयपीएलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनी सांगितेल की, 'महिला प्रीमियर लीग 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत खेळली जाणार आहे.' धुमल यांनी सांगितले की, पहिल्या हंगामासाठी महिला क्रिकेटपूंचा लिलाव हा महिला टी 20 वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर होणार आहे.

13 फेब्रुवारीला मुंबईत हा लिलाव पार पडणार आहे. बीसीसीआयने पाच संघाच्या लिलावातून 4669.99 कोटी रूपये कमावले आहेत. तर लीगच्या प्रसारण हक्काचा लिलाव करून त्यातून 951 कोटी रूपये कमावले. त्यामुळे IPL आता WPL ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लीग बनली आहे.

WPL मध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने सारख्या आयपीएलमधील फ्रेंचायजींनी संघ खरेदी केले आहेत. त्याचबरोबर कॅपरी ग्लोबल होल्डिंग्ज (लखनौ) आणि अदानी स्पोर्ट्सलाईनने देखील संघ खरेदी केले आहे.

WPL लीगमध्ये जवळपास 1500 खेळाडूंनी लिलावासाठी नोदंणी केली आहे. या बाबतची शेवटची यादी ही या आठवड्याच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे.

लिलावात प्रत्येक फ्रेंजायती खेळाडूंवर 12 कोटी रूपये खर्च करू शकतात. संघ किमान 15 तर जास्तीजास्त 18 खेळाडू घेऊ शकतात. या लीगमध्ये 22 सामने खेळले जाणार आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT