WPL Auction 2023
WPL Auction 2023 esakal
क्रीडा

WPL Auction 2023 : BCCI ने लिलावाची केली घोषणा; हरमनप्रीत, स्मृतीसह एलिस पेरीवरही असणार नजर

अनिरुद्ध संकपाळ

WPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावाची तारीख अखेर ठरली. बीसीसीआयने येत्या 13 फेब्रुवारीला जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीगच्या लिलावाचे आयोजन केले आहे. यात एकूण 409 महिला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. पहिली वहिली महिला प्रीमियर लीग ही 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे.

महिला प्रीमियर लीग 2023 लिलाव

  • महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण 409 महिला खेळाडू भाग घेणार आहेत.

  • एकूण 1525 खेळाडूंनी यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 409 खेळाडूंची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.

  • 409 खेळाडूंपैकी 246 खेळाडू हे भारतीय आहेत तर 163 खेळाडू विदेशी आहेत. 8 खेळाडू हे सहयोगी देशांमधील आहेत.

  • 409 खेळाडूंपैकी 202 खेळाडू कॅप्ड आहेत तर 199 अनकॅप्ड आहेत.

  • पाच संघासाठी जास्तीजास्त 90 स्लॉट उपलब्ध आहेत. यातील 30 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी आहेत.

  • सर्वाधिक 50 लाख रिझर्व प्राईस श्रेणीत 24 खेळाडूंचा समावेश आहे. यात हरमप्रीत कौर, स्मृती मानधना, दिप्ती शर्माचा समावेश आहे.

  • 19 वर्षाखालील टी 20 वर्ल्डकप विजेती कर्णधार शफाली वर्मा देखील याच 50 लाखाच्या सर्वोच्च श्रेणीत आहे.

  • याचबरोबर या श्रेणी 13 विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

  • 30 खेळाडू हे 40 लाख बेस प्राईस असलेल्या क्षेणीत आहेत.

  • लिलाव हा दुपारी 2.30 ला सुरू होणार आहे.

महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आयोजित करण्याचा मान हा मुंबईला मिळणार आहे. हंगामातील पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींच्या संघात होण्याची शक्यता आहे.

आयपीएलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनी सांगितेल की, 'महिला प्रीमियर लीग 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत खेळली जाणार आहे.' धुमल यांनी सांगितले होते की, पहिल्या हंगामासाठी महिला क्रिकेटपूंचा लिलाव हा महिला टी 20 वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर होणार आहे.

13 फेब्रुवारीला मुंबईत हा लिलाव पार पडणार आहे. बीसीसीआयने पाच संघाच्या लिलावातून 4669.99 कोटी रूपये कमावले आहेत. तर लीगच्या प्रसारण हक्काचा लिलाव करून त्यातून 951 कोटी रूपये कमावले. त्यामुळे IPL आता WPL ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लीग बनली आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT