virat kohli rohit sharma esakal
क्रीडा

कोहलीसंदर्भात पसरलेली 'ती' बातमी खोटी; BCCI अधिकारी म्हणाले...

कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. वैयक्तिक कारणास्तव तो वनडे खेळणार नसल्याची चर्चा रंगत असताना बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीने वनडेतून विश्रांतीसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 26 डिसेंबरला सेंच्युरियनच्या मैदानातून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल. या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारीला केपटाउनच्या मैदानात खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विराटच्या जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्याला जाण्यापूर्वीच रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला. परिणामी तो कसोटीला मुकणार आहे. त्यानंतर कोहली वनडे खेळणार नसल्याची चर्चा रंगली होती.

विराट कोहलीने कोणतीही सुट्टी मागितलेली नाही

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "विराट कोहलीने वनडे मालिकेतून विश्रांती घेण्यासंदर्भात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शहा यांच्याकडे कोणतीही अधिकृत विचारणा केलेली नाही. पुढे काय होईल ते आताच सांगता येणार नाही. पण सध्या तरी तो वनडेला मुकणार यात तथ्य नाही" कसोटी मालिकेनंतर 19, 21 आणि 23 जानेवारीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.

विराट कोहली कुटुंबियासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी विराट कोहलीसोबत त्याचे कुटुंबिय देखील असणार आहे. जैव सुरक्षितता आणि कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू ज्या चार्टेड विमानातून दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील, त्याच विमानातून खेळाडूंचे कुटुंबिय देखील प्रवास करतील, अशी माहितीही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आङे. त्यामुळे कुटुंबियांना वेळ देण्यासाठी तो वनडे सामन्यापासून दूर राहणार हे स्पष्ट होत आहे.

वामिकाचा पहिला वाढदिवस कोहलीसाठी ठरेल खास

कोहली आपल्या लाडक्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसामुळे वनडेतून माघार घेणार असल्याचे वृत्त होते. पण वामिकाचा पहिला वाढदिवस हा 11 जानेवारीला आहे. या दिवशी भारतीय संघाचा तिसरा कसोची सामना सुरु होईल. विशेष म्हणजे कोहलीसाठी हा क्षण खूप खास असेल. कारण मुलीच्या पहिल्या बर्थडे दिवशी तो शंभरावा कसोटी सामना खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT