Jay Shah  ESAKAL
क्रीडा

Asia Cup 2023 : भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? जय शहांनी स्पष्ट सांगितले

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Jay Shah : पुढच्या वर्षीचा आशिया कप 2023 हा पाकिस्तानात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ पुढचा आशिया कप खेळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. टीम इंडिया पुढील वर्षी पाकिस्तानच्या भूमीवर जाणार की नाही यावर आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मत व्यक्त केलं आहे.

जय शहा म्हणाले की, 'आशिया कप 2023 हा त्रयस्थ ठिकाणी होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा निर्णय सरकार घेईल. त्यामुळे आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही. मात्र आशिया कप 2023 हा त्रयस्थ ठिकाणी होणार आहे हे ठरलं आहे.'

मुंबईत मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला. बीसीसीआयचे सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे आणि आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही.

भारत आणि पाकिस्तान संघाने 2012-13 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेली नाही. या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ दोन वेळा एकमेकांविरुद्ध खेळला आहे. ज्यामध्ये भारताने एक सामना जिंकला होता तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियात 23 ऑक्टोबरला होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT