BCCI Thinking Of Hiring an Agency to Probed Wriddhiman Saha Journalist Issue
BCCI Thinking Of Hiring an Agency to Probed Wriddhiman Saha Journalist Issue Esakal
क्रीडा

बीसीसीआय वृद्धीमान साहा प्रकरणाची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत करणार?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) त्याला पत्रकाराने मुलाखतीसाठी धमकावल्याचा (Journalist Threat) दावा केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल बीसीसीआयने (BCCI) घेतली असून बीसीसीआय आता या प्रकरणाची एखाद्या स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यासाठी ही स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे. (BCCI Thinking Of Hiring an Agency to Probed Wriddhiman Saha Journalist Issue)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (BCCI Top Official) याबाबत चर्चा केली आहे. प्रत्येक खेळाडू, निवडसमिती, प्रशिक्षक, सहाय्यक स्टाफ आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारीची चौकशी झाली पाहिजे असे त्यांचे मत आहे. बीसीसीआयच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे की खेळाडू काही विषयांवर बोलण्यास धजावत नाहीत.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'हा फक्त वृद्धीमान साहाचा प्रश्न नाही. प्रत्येक खेळाडूचे म्हणणे ऐकून घेतले गेले पाहिजे. या प्रक्रियेसाठी तुम्हाला एक स्वतंत्र संस्था गरजेची आहे. मात्र यासाठी आधी तुम्हाला तुमच्या संस्थेतील सर्वांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. माध्यमांबाबतचे विषय घेऊन काही खेळाडू विशिष्ठ अधिकाऱ्यांकडे येतात. त्या प्रत्येकाच्या अडचणींबाबत चौकशी झाली पाहिजे. विशेष म्हणजे माजी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी देखील बोलले पाहिजे. जर सर्वांचे एकमत असेल तर अशा स्वतंत्र संस्थेमार्फत त्याची चौकशी करता येईल.'

जर अशा प्रकराच्या आरोपांची प्रकरणे सोडवली गेली तरच ड्रेसिंग रूममधील (Dresing Room) पवित्रता अबाधित राखता येईल. अशी प्रकरणे सोडवण्यासाठी विशेष समिती हा उत्तम पर्याय असू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT