Rishabh Pant 
क्रीडा

Rishabh Pant : सूर्या यादव अन् मोहम्मद शमीनंतर आता BCCI ने ऋषभ पंतबाबत घेतला मोठा निर्णय!

Kiran Mahanavar

Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आता संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज दिसत आहे. कारण काही दिवसाआधी तो टीम इंडियाच्या सराव सत्रात क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ऋषभ आता आधीपेक्षा आता बरा दिसत आहे.

रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ऋषभ पंतच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही. त्यासाठी आता बीसीसीआयने खास योजना आखली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आता पंतला रिकव्हरीसाठी विशेष सल्लामसलत करण्यासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ऋषभ पंत आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो.

पंतपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांनाही लंडनला पाठवले आहे. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने संघाबाहेर आहे. ऋषभ पंत क्रिकेट खेळून एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. आता चाहते पंतच्या मैदानात परतण्याची वाट पाहत आहेत.

पंतच्या संघात पुनरागमन करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, चाहत्यांना आशा आहे की ते पंत पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पाहतील. दुसरीकडे, पंतही स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये मेहनत घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT