Ben Cutting wife Erin Holland Facial Reaction Video Gone Viral during PSL 2022 match  esakal
क्रीडा

VIDEO: घडलं असं काही की बेल्स अन् बेन कटिंगच्या बायकोचा चेहरा देखील पडला!

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये (PSL 2022) सुरू असलेल्या सामन्यातील काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. असाच एक पेशावर जल्मी आणि कराची किंग्ज यांच्या सामन्यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना देखील आश्चर्य वाटले. मात्र या व्हिडिओतील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे बेन कटिंगच्या बायोकने दिलेली रिअ‍ॅक्शन! (Ben Cutting wife Erin Holland)

पेशावर जल्मीकडून खेळणारा बेन कटिंग बॅटिंग (Ben Cutting) करत होता. सामन्याचे 14 वे षटक मोहम्मद नबी टाकत होता. त्याने टाकलेला चौथा चेंडू बेन कटिंगच्या बॅटची कडा घेऊन गेला. स्टम्पवरच्या बेल्स देखील खाली पडल्या. अंपायर गोधळे होते त्यामुळे तेही काय झालं हे जाणून घेण्यासाठी लेग अंपायरकडे सरसावले. दरम्यान, कॅमेरामॅनने कॅमेरा बेन कटिंगच्या बायकोकडे वळवला. बेन कटिंगची बायको (Ben Cutting wife) एरिनने अशी काही प्रतिक्रिया दिली होती की समालोचकांना हासू आवरले नाही.

पेशावर जल्मीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 173 धावा केल्या. यात शोएब मलिकने (Shoaib Malik) 28 चेंडूत 52 धावांची आक्रमक खेळी केली. याचबरोबर बेन कटिंगने 22 चेंडूत 24 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात कराची किंग्जला 20 षटकात 6 विकेट्स गमावून 164 धावाच करता आल्या. कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 63 चेंडूत 90 धावांची झुंजार खेळी केली मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT