Ravi Shastri BCCI Twitter
क्रीडा

WTC : शास्त्री गुरुजींचा आयसीसीला सल्ला!

मेगा टेस्ट फायनलसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरवण्यासाठी काही बदल करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले.

सुशांत जाधव

ICC World Test Championship : भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यात पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडच्या मैदानात रंगणार आहे. भारतीय संघ फायनल जिंकून आपला रुबाब दाखवण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही कसोटी सामना जिंकण्यासाठी उत्सुक असेल. पाच दिवसाच्या खेळाचा निकाल लागला नाही तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी संयुक्तरित्या देण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यासंदर्भातील माहिती दिली होती. मेगा टेस्ट फायनलसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरवण्यासाठी काही बदल करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निकाल लावायचा असेल तर एका लढतीऐवजी बेस्ट ऑफ थ्री फॉर्म्युला अंमलात आणायला हवा. यामुळे समान संधी उपलब्ध होईल, असे रवी शास्त्रींनी म्हटले आहे. एका अर्थाने शास्त्रींनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसंदर्भात आयसीसीला एक सूचनाच केली आहे. पुढील काळात आयसीसी शास्त्री गुरुजींचा सल्ला मान्य करुन काही बदल करणार का? हे पाहावे लागेल.

Team India

भारतीय संघांच्या व्यस्त शेड्युलसंदर्भातही रवी शास्त्रींनी भाष्य केले. खेळाडूंना शारीरिक फिटनेसपेक्षा मनाने ताजेतवाणे राहण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सद्य परिस्थितीत कोणालाच हे दडपण सतत झेलणे शक्य नाही. भारतीय संघ इंग्लंडला कसोटी मालिका खेळत असताना दुसरा भारतीय संघ श्रीलंकेला जाणार आहे. व्यस्त कार्यक्रमात खेळाडूंना मनाच्या तयारीनिशी उतरावे लागले, ही गोष्ट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने देखील मान्य केलीये.

India Squad For WTC

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर पराभवाचा सामना करावा लागला होता. यावर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, न्यूझीलंड दौऱ्यात आम्ही सर्वोत्तम खेळ केला नव्हता त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळात सुधारणा करुन सर्वोत्तम खेळ करु. इंग्लंडचे भरपूर दौरे केले असल्यामुळे या दौऱ्यासंदर्भात कोणतेही दडपण नाही. संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी खेळाडूंना प्रोत्साहीत करुन आम्ही विजय मिळवू, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. साउथहॅम्प्टनच्या मैदानात रंगणाऱ्या सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. आयपीएलपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध मायदेशात कसोटी सामना खेळला होता. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील दिमाखदार कामगिरी भारतीय संघाला सकारात्मक ऊर्जा देणारी ठरेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे ते भारतीय संघासमोर आव्हान उभे करु शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT