big bash 2022 sydney thunder all out in only 15 runs henry smallest score in t20 cricket  
क्रीडा

Big Bash 2022: खेळाडू 11 अन् धावा 15! क्रिकेटविश्वातील सर्वात लाजिरवाणा पराभव; 35 चेंडूत संपला खेळ

सकाळ डिजिटल टीम

Sydney Thunder vs Adelaide Strikers BBL: क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. खूप वेळा तुम्ही खूप कमी स्कोअरवर टीम ऑलआऊट होताना पाहिलं असेल. पण ऑस्ट्रेलियाच्या लोकल टूर्नामेंट बिग बॅश लीगमध्ये असे काही घडले आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) सिडनी थंडर्स संघ अॅडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि अवघ्या 15 धावांत सर्वबाद झाला. यामुळे संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची भर पडली आहे. अवघ्या ३५ चेंडूत संपूर्ण संघ सर्वबाद झाला.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात अ‍ॅडलेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 139 धावा केल्या, त्यामुळे सिडनी संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु अॅडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी माहोलच बदलून टाकला आणि सिडनी थंडर्सच्या फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरली. संघाचे सर्व फलंदाज मिळून केवळ 15 धावा करू शकले. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात लहान धावसंख्या आहे. यापूर्वी 2019 मध्ये तुर्कीचा संघ झेक प्रजासत्ताकासमोर 21 धावांत ऑलआऊट झाला होता.

एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही

140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचे फलंदाज क्रीझवर उभे राहू शकले नाहीत. सलामीवीर अॅलेक्स हेल्स, मॅथ्यू गिल्क्स खातेही उघडू शकले नाहीत. रिली रुसोचे खाते उघडले पण तो 3 धावांवर बाद झाला. संघाच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. त्याचबरोबर एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. डॅनियल सॅम्ससारख्या खेळाडूलाही केवळ 1 धाव काढता आली. सिडनीची खराब कामगिरी पाहून चाहते खूपच निराश झाले.

गोलंदाजांनी अक्षरशः कहर केला

अॅडलेड स्ट्रायकर्सचे गोलंदाज हेन्री थॉर्टन आणि वेस एगर यांनी किलर गोलंदाजी करत सिडनी थंडर्स संघाला थक्क केले. थॉर्टनने 2.5 षटकांत केवळ 3 धावा देऊन 5 बळी घेतले, तर वेस एगरने 6 धावांत 4 बळी घेतले. अॅडलेड संघाने हा सामना 124 धावांनी जिंकला. अ‍ॅडलेडच्या गोलंदाजांनी साध्य केलेल्या या पराक्रमाला जगात तोड नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT