IND vs AUS 3rd Test Australian Player Returning Home esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : कांगारू 2 पराभवांनी गांगरले! तब्बल अर्धा डझन खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd Test Australian Player Returning Home : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील आता कुठे दोन कसोटी सामने झाले आहेत. मात्र कांगारूंचा संघ भारतीय फिरकीची कमला पाहून इतका गांगारून गेलाय की संघातील एका पाठोपाठ एक खेळाडू मायदेशाची वाट धरू लागले आहेत. भारताने पहिल्या दोन कसोटी अवघ्या 6 दिवसात जिंकल्या.

मालिकेतील तिसरी कसोटी ही इंदौर येथे होणार आहे. या कसोटीला अजून 8 दिवस अवकाश आहे. मात्र तोपर्यंतच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ मायदेशात परतला आहे. नुकतेच मॅट रेनशोने देखील मायदेशात मायदेशात परतला. त्याच्या सोबतीला लान्स मॉरिस देखील आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, अॅश्टन एगर आणि डेव्हिड वॉर्नर मयादेशात परतले होते. आता या दोघांची देखील भर पडली आहे.

मायदेशी परतलेले कांगारू

पॅट कमिन्स (कुटुंबाचे वैद्यकीय कारण)

डेव्हिड वॉर्नर (कोपराची दुखापत)

अॅश्टर एगर (शेफिल्ड शिल्ड खेळण्यासाठी)

जॉस हेजलवूड (घोट्याची दुखापत)

टॉड मर्फी (साईड स्ट्रेन)

मिचेल स्वेपसन (सध्या ऑस्ट्रेलियातच आहे)

लान्स मॉरिस (शेफिल्ड शिल्ड खेळण्यासाठी)

मॅथ्यू रेनशॉ

पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणाने तातडीने मायदेशात परला. तर डेव्हिड वॉर्नर, हेजवलूड, टॉड मर्फी यांना दुखापतीमुळे मायदेशात परतावे लागले. अॅश्टन एगरला संघ व्यवस्थापन खेळवणार नसल्याने तो मायदेशात परतला आहे. तो ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत स्पर्धा शेफिल्डी शिल्ड खेळणार आहे.

दुसरीकडे या मालिकेतील पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फीला साईड स्ट्रेनचा त्रास होऊ लागल्याने तो मायदेशात परतला आहे. तर मिचेल स्वेपसन हा त्याच्या मुलाच्या जन्मासाठी दौरा सोडून ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस देखील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा खेळण्यासाठी मायदेशात परतला आहे. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन फिट झाल्याने ते मॉरिस मायदेशी परतला.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT