इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा गुरुवारी (ता. १२) करण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम (Brendon McCullum) याची इंग्लंड (England) आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर त्याची नियुक्ती करण्यात आली. (Brendon McCullum is the head coach of the England Test team)
ब्रॅडन मॅक्युलमची (Brendon McCullum) कसोटी मुख्य प्रशिक्षकपदी (head coach) नियुक्ती करण्याव्यतिरिक्त संघात अनेक बदल झाले आहेत. संघाचा कर्णधारही बदलण्यात आला आहे. रॉब की यांची पुरुष संघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कसोटीचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे सोपवणारे ते पहिले होते. याआधी जो रूट हा कसोटी संघाचा कर्णधार होता. मात्र सततच्या खराब कामगिरीमुळे त्याने संघातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जो रूटने संघाचे नेतृत्व केले होते. तिषे इंग्लिश संघाचा १-० असा पराभव झाला.
इंग्लंड (England) क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, इंग्लंडचे पुरुष क्रिकेट व्यवस्थापकीय संचालक रॉब की, धोरणात्मक सल्लागार अँड्र्यू स्ट्रॉस आणि कार्यप्रदर्शन संचालक मो बॉबॅट यांचा समावेश असलेल्या निवड समितीने स्पर्धात्मक मुलाखत प्रक्रियेदरम्यान ब्रॅडन मॅक्युलम यांच्यावर खूप प्रभाव पडल्याचे एकमताने मान्य केले. आता ब्रॅडन मॅक्युलमला (Brendon McCullum) कोलकाता नाईट रायडर्सचा साथ सोडावा लागणार आहे. तो आयपीएल २०२२ पर्यंत केकेआरचा मुख्य प्रशिक्षक राहील.
वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी इंग्लंड (England) संघाने ॲशेस मालिकेत भाग घेतला होता. तिथे त्यांना ४-० अशा फरकाने दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर ख्रिस सिल्व्हरवुडने मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी ब्रॅडन मॅक्युलमची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडच्या पुरुषांच्या प्रशिक्षकाची कर्तव्ये विभागली गेली आहेत. लाल आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी वेग वेगळे प्रशिक्षक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.