Brendon McCullum plotting Shreyas Iyer dismissal from the balcony esakal
क्रीडा

Shreyas Iyer : मॅक्युलमची 'चाणक्य निती', एक इशारा अन् श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील पाचव्या कसोटीत सुरूवातीचे भारताचे वर्चस्व मोडून काढत इंग्लंडने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. भारताने एजबेस्टन कसोटीत दुसऱ्या डावात 245 धावांपर्यंतच मजल मारली. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र भारताच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील फेल गेला. विशेष म्हणजे केकेआरचा माजी प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमने (Brendon McCullum) आपल्याच माजी कर्णधाराला चाणक्य रणनिती वापरत बाद केले.

ब्रँडन मॅक्युलमने श्रेयस अय्यर क्रीजवर असताना पॅव्हेलियनच्या गॅलरीमधून गोलंदाजाला खुणावले. त्याने वेगवान गोलंदाज मॅटी पॉट्सला शॉर्ट बॉल (Short Ball) टाकण्यास सांगितले. मॅटी पॉट्सने देखील श्रेयस अय्यरला शॉर्ट बॉल टाकला. या बॉलवर श्रेयस अय्यरने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तो स्क्वेअर लेगला झेल देऊन बसला. मॅक्युलमने रचलेल्या सापळ्यात श्रेयस अय्यर अलगद सापडला.

मॅक्युलम आणि श्रेयस अय्यर हे केकेआर संघात एकत्र होते. त्यामुळे मॅक्युलमला अय्यरची बलस्थाने आणि कच्चे दुवे देखील माहिती आहेत. दरम्यान, मॅक्युलमची ही रणनिती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

भारताने ठेवलेल्या 378 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर अॅलेक्स लीज आणि झॅक क्राऊलीने शतकी सलामी दिली. त्यानंतर बुमराहने इंग्लंडला पाठोपाठ धक्के देत इंग्लंडची अवस्था 3 बाद 109 धावा अशी केली. आता सामना भारताच्या मुठीत असल्याचे वाटत असतानाच जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचून इंग्लंडला चौथ्या दिवसअखेर 3 बाद 259 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडला आता विजयासाठी पाचव्या दिवशी 119 धावांची गरज असून सध्या जो रूट 76 आणि बेअरस्टो 72 धावांवर खेळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT