क्रीडा

अँडरसन-बुमराहमध्ये काय झाला राडा? अश्विनने सांगितला किस्सा

विराज भागवत

बुमराहने अँडरसवर बाऊन्सरचा भडीमार केला अन् त्यानंतर...

Ind vs Eng Test: भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी दारूण पराभव केला. या पराभवामुळे इंग्लंडची पुरती नाचक्की झाली. या सामन्यात चाहत्यांना मनोरंजनाचे अनेक क्षण अनुभवता आले. त्यातील एक म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या अँडरसनला टाकलेले बाऊन्सर आणि त्यानंतर त्यांच्यात झालेली बाचाबाची... तो प्रकार नक्की काय घडला आणि त्यानंतर काय घडले? याबद्दलची माहिती टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविंद्र जाडेजा आणि गोलंदाजी प्रशिक्षक आर श्रीधर यांनी सांगितले.

बुमराहने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनवर बाऊन्सरची बरसात केली. त्यामुळे अँडरसन चांगलाच खवळला होता. ते साऱ्यांनीच टीव्हीवरील लाईव्ह प्रक्षेपणात पाहिलं पण त्यानंतर नक्की काय घडलं? ते आर अश्विन आणि श्रीधर यांनी सांगितलं. बुमराहने अचानक अँडरसनवर वेगवान बाऊन्सरची बरसात सुरू केल्यानंतर अँडरसनने बुमराहला थेट सवाल केला की तू इतका वेगाने गोलंदाजी का करतो आहेस? तुला मी अशी गोलंदाजी केली होती का?

त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्यानंतर सर्व खेळाडू पुन्हा मैदानाबाहेर जात होते. त्यावेळी बुमराहने अँडरसनला मैत्रिपूर्ण संबंधातून सॉरी म्हणायला गेला होता पण अँडरसन मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. खरं पाहता अँडरसनला बुमराहने जी गोलंदाजी केली होती, त्यामागे खास असा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे त्याने तशी गोलंदाजी केल्याबद्दल माफी मागण्याची गरजही नव्हती पण तरीही बुमराह सॉरी म्हणत असताना अँडरसनने त्याची माफी मान्य केली नाही. त्यामुळे बुमराह अधिकच खवळला आणि त्यातूनच पाच्या दिवशी दमदार अशी फलंदाजी व गोलंदाजी करण्याचा जोश सर्व खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला, असा किस्सा अश्विन आणि श्रीधर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT