Brazil vs Cameroon FIFA World Cup 2022 sakal
क्रीडा

FIFA WC22 : कॅमेरूनने रचला इतिहास! बलाढ्य ब्राझीलला पराभूत करण्याची केली किमया

यंदाची फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा धक्कादायक निकालांची नोंद करीत आहे. जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया अशा निकालांमध्ये आज कॅमेरूनची भर पडली.

Kiran Mahanavar

Brazil vs Cameroon FIFA World Cup 2022 : यंदाची फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा धक्कादायक निकालांची नोंद करीत आहे. जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया अशा निकालांमध्ये आज कॅमेरूनची भर पडली. आज रात्री झालेल्या सामन्यात कॅमेरूनने ब्राझीलचा १-० असा पराभव केला. गोल करणारा अबुबेकरने जल्लोषाच्या नादात अंगातील टी शर्ट काढून हवेत फिरविला आणि त्याच क्षणी पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. बलाढ्य ब्राझीलला पराभूत करण्याची केली किमया केल्यानंतर कॅमेरूनने इतिहास रचला आहे. फिफा विश्वचषकात ब्राझीलला पराभूत करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

उत्तरार्धात ब्राझीलच्या गोलपोस्टवर सतत धडका देणाऱ्या कॅमेरूनला अगदी ९० व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. उजव्या बगलेतून चेंडू घेऊन सुसाट सुटलेल्या नोगम बँकलीने उंचावर थेट डीच्या मध्यभागी पास दिला. ब्राझीलच्या तीन रक्षकांमध्ये घुसत अबुबेकरने त्यांच्या देशासाठी संस्मरणीय गोल गेला आणि तोच त्यांच्या विजयासाठी पुरेसा ठरला.

जादा नऊ मिनिटांच्या वेळेत ब्राझीलला गोल परत फेडण्यासाठी संधी साडेआठव्या मिनिटाला मिळाली होती; पण ती साधता आली नाही. कॅमेरूनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांनी ब्राझीलवर विजय मिळवत त्याचा गोड शेवट कैला. ब्राझील यापूर्वीच बाद फेरीत पोचले आहे. संपूर्ण सामन्यात ब्राझीलला ११ कॉर्नर मिळाले आणि त्यांनी २२ वेळा कॅमेरूनच्या गोलपोस्टच्या दिशेने धडका दिल्या; पण त्या साऱ्या व्यर्थ ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT