Ranji Trophy sakal
क्रीडा

रणजीचे हेडमास्तर : कॅप्टनला लग्नासाठी दिलेली फक्त 2 दिवसांची सुट्टी

चंद्रकांत पंडित फक्त कठोर नाही तर आमिर खान स्टार 'दंगल' च्या हनिकराक बापूसारखा हानिकारक गुरू आहे.

Kiran Mahanavar

Ranji Trophy 2021-22 Final: प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश क्रिकेट संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित त्यांच्या शिष्यांनी 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईचा पराभव करून प्रथमच रणजी चॅम्पियन बनले आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला.

मध्य प्रदेशसाठी हे विजेतेपद मिळवणे स्वप्नापेक्षा कमी नाही. विशेषत: संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासाठी हा विजय खुपच खास होता. या विजयासह चंद्रकांत पंडित यांचे अधुरे स्वप्नही पूर्ण झाले. पंडित हे कर्णधार आदित्य श्रीवास्तवचे प्रिय मानले जातात, परंतु गुरु आणि शिष्य मधल्या काही गोष्टी समोर आले आहे, जे जाणून तुम्ही म्हणाल की तो फक्त कठोर नाही तर आमिर खान स्टार 'दंगल' च्या हनिकराक बापूसारखा हानिकारक गुरू आहे.

संघाचा कर्णधार आदित्य श्रीवास्तवला गेल्या वर्षी लग्नासाठी सुट्टी हवी होती. त्यानी लग्नासाठी दहा दिवस सुट्ट्या मागितल्या, पण पंडितांनी लग्न आणि त्याचे सेलिब्रेशनसाठी दोन दिवसाच्या सुट्ट्या दिल्या. याबद्दल चंद्रकांत पंडितने विजेतेपद पटकावल्यानंतर सांगितले की, आदित्यचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. तो माझ्याकडे आला आणि लग्नासाठी किती सुट्टी घेऊ असं मला विचारलं. मग मी त्याला बोलो मी फक्त 2 दिवस सुट्टी देऊ शकतो.

विजेतेपदाबद्दल पंडित म्हणाले की, रणजी करंडक जिंकणे खूप खास होते, कारण 23 वर्षांपूर्वी जे काही चुकले होते ते त्याने 2022 मध्ये पूर्ण केले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1998/99 च्या फायनलमध्ये एमपीचा कर्नाटककडून सहा गडी राखून पराभूत झाला होता. पंडित यांनी 2022 मध्ये त्याच संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून यशाची चव चाखली कारण मध्य प्रदेशने मुंबईवर सहा विकेट्सने मात करून त्यांचे पहिले रणजी विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

हायव्होल्टेज ड्रामा! Virat Kohli च्या पर्सनल बॉडिगार्डकडून पत्रकारांना शिवीगाळ, BCCI च्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित; कार्डिफमध्ये राडा

Sakri-Shirdi Highway Protest: खड्ड्यांत वृक्षारोपण; राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन "महामार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा"; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT