Chess Olympiad 9 Month pregnant Harika Dronavalli Emotional Instagram Post After India Chess Women Team Won Bronze Medal esakal
क्रीडा

Chess Olympiad : 9 ऑलिम्पियाड खेळलेल्या हरिकाने गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यात जिंकले पदक

अनिरुद्ध संकपाळ

चेन्नई : हरिका द्रोणावल्ली (Harika Dronavalli) ही वयाच्या 13 वर्षापासून भारतीय महिला बुद्धीबळ संघाचा भाग आहे. तिने जवळपास 18 वर्ष बुद्धीबळात भारताचे नेतृत्व केले. मात्र यंदाच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) ती सहभाग घेईल का नाही याबाबत साशंकता होती. कारण ती गरोदर (Pregnant) होती. मात्र ज्यावेळी हरिकाला यंदाचे चेस ऑलिम्पियाड भारतात होणार आहे असे समजले त्यावेळी तिने सर्वात प्रथम डॉक्टरांना गाठले. तिचा डॉक्टरांना एकच प्रश्न होता मी चेस ऑलिम्पियाड खेळू शकते का? चेस ऑलिम्पियाड आणि हरिकाचा 9 वा महिना गाठून येणार होते. मात्र देविका चेस ऑलिम्पियाड खेळली आणि भारताने इतिहास रचला. चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाने पहिलेच पदक (Bronze Medal) जिंकले. हरिका द्रोणावल्ली या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. तिने तिचे सात सामने ड्रॉ केले.

पदक जिंकल्यानंतर 9 महिन्याच्या गरोदर हरिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणते, 'मी वयाच्या 13 व्या वर्षी भारतीय महिला बुद्धीबळ संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून मी 18 वर्षे भारतीय महिला संघाकडून खेळत आहे. मी आतापर्यंत 9 चेस ऑलिम्पियाड खेळले आहे. भारतीय महिला संघाला पदक पोडियममध्ये पाहण्याचे माझे स्वप्न होते. ते यंदाच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये पूर्ण झाले.

हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. कारण मी हे पदक 9 महिन्याची गरोदर असताना जिंकले आहे. ज्यावेळी मी चेस ऑलिम्पियाड भारतात होणार आहे असे ऐकले त्यावेळी मी माझ्या डॉक्टरांना विचारले की मी चेस ऑलिम्पियाड खेळू शकते का? त्यांनी देखील हे शक्य आहे असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट सांगितली. जर तू निरोगी राहिलीस कोणतीही गुंतागुंत झाली नाही तरच हे शक्य आहे.

डॉक्टरांनी हे सांगितल्यापासून मी माझी सर्व प्राथमिकताच बदलली. माझ्या सर्व गोष्टी चेस ऑलिम्पियाडभोवती फिरू लागल्या. मी ऑलिम्पियाड खेळण्यासाठीच प्रत्येक पाऊल टाकले. बेबी शॉवर नाही, पार्टी नाही, कोणतही सेलिब्रेशन नाही. हे सर्व पदक जिंकल्यानंतर करायचं असं मी ठरवलं होते. मला चेस ऑलिम्पियाडमध्ये खेळता यावे यासाठी काही महिन्यापासून प्रयत्न करत होते. अखेर मी हे करून दाखवले. भारतीय महिला चेस संघाने ऑलिम्पियाडमधील आपले पहिले वहिले पदक जिंकले.'

भारतीय महिला संघाने चेस ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक जिंकले. या संघाचे नेतृत्व कोनेरू हम्पीने केले. या संघात हरिका द्रोणावल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांचा समावेश होता. भारतीय पुरूष ब संघाने देखील चेस ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT