Chess World Cup final 2023 esakal
क्रीडा

Chess World Cup final 2023 : प्रग्नानंदची नंबर वन कार्लसनला कडवी टक्कर, पहिला गेम ड्रॉ

अनिरुद्ध संकपाळ

Chess World Cup final 2023 : बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात आज पहिल्या गेममध्ये भारताच्या 18 वर्षाच्या प्रग्नानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला चांगलीच टक्कर दिले. पहिल्यांदा आघाडीवर असलेला प्रग्नानंदने कार्लसनचे टेन्शन वाढवलं होतं. मात्र अनुभवी कार्लसनने पिछाडी भरून काढत गेम ड्रॉ केला.

प्रग्नानंद हा बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत फायनलमध्ये पोहचणारा सर्वात कमी वयाचा बुद्धीबळपटू आहे. त्याने यापूर्वीही वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं असून हेड टू हेडमध्ये दोघेही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. विशेष म्हणजे कार्लसनला एकदाही एफआयडीइ वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या फायनलकमध्ये पहिल्या रॅपिड गेममध्ये सुरूवातीला आघाडी घेतली होती. तो वेळेच्या पुढे होता. तर कार्लसन त्याचा वेळ घेत होता. भारताच्या युवा बुद्धीबळटून त्याच्यावर चांगलाच दबाव ठेवला होता.

नियमानुसार दोन्ही बुद्धीबळपटूंना 1 तास 30 मिनिटात 40 चाली खेळायच्या असतात. मात्र कार्लसनच्या पहिल्या तासाभरात फक्त 13 चाली झाल्या होत्या.

मात्र त्यानंतर प्रग्नानंद हा 15 व्या चालीनंतर मागे पडला. या दरम्यान, दोन्ही बुद्धीबळपटूंनी आपल्या क्वीन्स गमावल्या. गेमची चांगली सुरूवात करणारा प्रग्नानंद जसजसा वेळ संपू लागला त्यावेळी तसतसा तो मागे पडला. अखेर पहिला गेम ड्रॉ झाला.

आता दुसरा गेम हा उद्या होणार आहे. जर या गेममध्ये देखील निर्णय झाला नाही तर टाय ब्रेकर सामना खेळवला जाईल. प्रग्नानंद आणि कार्लसन यांच्यातील हा 20 वा सामना आहे. यात कार्लसन थोडासा आघाडीवर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT