Cheteshwar Pujara Batting Average esakal
क्रीडा

पुजारामुळे १०० वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'असे' दुसऱ्यांदाच घडले

अनिरुद्ध संकपाळ

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) कारकिर्द पणाला लागली आहे. पहिल्या कसोटीत धावा करण्यात अपयश आलेल्या चतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही निराशा केली होती. मात्र दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी अर्धशतक ठोकले. त्यामुळे संघातील डळमळीत झालेले त्याचे स्थान पुढच्या सामन्यासाठी तरी पक्के झाले आहे. (Cheteshwar Pujara Batting Average)

चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara)नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावरून चांगली सुरुवात केली. मात्र गेल्या वर्षी त्याने एक असा कारनामा केला आहे की त्याची इतिहासात एका वेगळ्याच कारणाने नोंद झाली. चेतेश्वर पुजाराने २०२१ मध्ये १४ कसोटी सामन्यात ७०२ धावा केल्या. त्याची सरासरी होती २८.०८! चेतेश्वर पुजाराचा शतकांचा दुष्काळ २०२१ मध्येही कायम राहिला. त्याला या वर्षी एकही शतक झळकावता आले नाही.

मात्र तरी देखील तो यंदाच्या वर्षात सर्वाधिक कसोटी (Most Test Runs In Year 2021) धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये विराजमान आहे. एखादा फलंदाज ज्याची वर्षातील कसोटी धावा करण्याची सरासरी ३० पेक्षाही कमी आहे तो त्या वर्षीच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच फलंदाजांमध्ये समाविष्ट होण्याची ही इतिहासातील दुसरीच घटना आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज नील हार्वे यांनी १९५६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथे स्थान पटकावले होते. त्यांनी त्या वर्षी २८.५० च्या सरासरीने ४५६ धावा केल्या होत्या.

जो रुटने केल्या २०२१ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा

इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षी १७०८ धावा ठोकल्या आहेत. त्यानंतर या यादीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ९०३ धावा करुन दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०२१ मध्ये ९०२ धावा केल्या आहेत. ७४८ धावा करुन चौथ्या स्थानावर ऋषभ पंत (Rishabh Pant) विराजमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT