Cheteshwar Pujara Century After 4 Years ESAKAL
क्रीडा

Cheteshwar Pujara : म्हातारा समजू नका! गिल पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखत ठोकलंय शतक

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Century After 4 Years : भारताचा वरिष्ठ कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने अखेर आपला 4 वर्षे चाललेला शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात 102 धावा केल्या. पुजाराने पहिल्या डावात देखील 90 धावांची खेळी केली होती. मात्र तो 10 धावांनी शतकापासून वंचित राहिला होता. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात पुजाराने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवत युवा शुभमन गिलच्या स्ट्राईक रेटपेक्षा जास्ट स्ट्राईक रेट राखत शतक ठोकले. पुजाराने 130 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दितील सर्वात वेगवान शतक ठरले.

पुजाराला पहिल्या डावात 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची संधी मिळाली होती, मात्र तो तसे करू शकला नाही. पुजाराला डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने क्लीन बोल्ड केले. पुजाराने जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. पुजाराने सिडनी कसोटीत 193 धावा केल्या. त्यानंतर पुजाराला आजपर्यंत शतक झळकावता आलेले नव्हते. अखेर हा दुष्काळ त्याने दुसऱ्या डावात संपवला. पुजाराने 130 चेंडूत शतकी खेळी केली. त्याने 78.46 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकले. तर युवा गिलने 72.37 च्या सरासरीने शतक ठोकले होते.

चेतेश्वर पुजाराने 130 चेंडूत नाबाद 102 धावा करत आपले सर्वात वेगवान शतक ठोकले. याचबरोबर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. आता बागंलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT