Cheteshwar Pujara Test Record esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने डॉन ब्रॅडमन यांना टाकलं मागं, कसोटीच्या खास क्लबमध्येही दाखल

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Test Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने 12 धावा करत महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. याचबरोबर चेतेश्वर पुजाराने आपल्या 7000 कसोटी धावा देखील पूर्ण केल्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा पुजारा हा आठवा फलंदाज ठरला.

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने आपले कसोटीमधील सर्वात वेगवान शतक ठोकले होते. याचबरोबर चार वर्षांचा शतकांचा दुष्काळ देखील संपवला होता. दुसऱ्या सामन्यात देखील त्याने सकारात्मक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र 55 चेंडूत 24 धावा केल्यानंतर तैजुल इस्लामने त्याला बाद करत भारताला तिसरा धक्का दिली.

पुजाराने बाद होण्यापूर्वी आपल्या कसोटीतील 7000 धावा पूर्ण केल्या. त्याने आतापर्यंत 98 कसोटी सामन्यात 44.77 च्या सरासरीने 7000 धावा करत सर डॉन ब्रॅडमन यांना देखील मागे टाकले. ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दित 55 कसोटीत 6996 धावा केल्या आहेत. याचबरोबर पुजारा कसोटीत 7000 धावा पूर्ण करणार आठवा भारतीय फलंदाज ठरला.

भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर - 15921

राहुल द्रविड - 13265

सुनिल गावसकर - 10122

व्हीव्हीएस लक्ष्मण - 8781

विरेंद्र सेहवाग - 8503

विराट कोहली - 8099

सौरभ गांगुली - 7212

चेतेश्वर पुजारा - 7000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT