Wrestlers Protest Priyanka Gandhi esakal
क्रीडा

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कुस्तीपटू गीता फोगटनंही ट्विट करत विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.

Wrestlers Protest : भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शनं सुरु केली आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपही विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी केला आहे. जंतरमंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झालंय. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांवर ट्विट करत चौकशीची मागणी केलीये.

प्रियांका गांधींनी आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंबद्दल लिहिलंय, "आमचे खेळाडू देशाची शान आहेत. ते जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीनं देशाची प्रतिष्ठा उंचावत असतात. या खेळाडूंनी कुस्ती महासंघ आणि त्याच्या अध्यक्षांवर शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंचा आवाज ऐकला गेला पाहिजे. आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे."

कुस्तीपटू गीता फोगटनंही ट्विट करत विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. तिनं लिहिलंय, "आज हे चित्र पाहून खूप वाईट वाटतं की, आपल्या देशाचे ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे धरून बसले आहेत. ही हुकूमशाही थांबली पाहिजे. आज आम्ही आमच्या खेळाडूंच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत." कुस्तीपटूतून राजकारणी बनलेल्या बबिता फोगटनंही या प्रकरणावर ट्विट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT