100 Spectators Allowed Day Nnight Test Bengaluru
100 Spectators Allowed Day Nnight Test Bengaluru Sakal
क्रीडा

IND vs SL : शंभर टक्के! दोन वर्षांनी क्रिकेट स्टेडियम गजबजणार

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या (Bengaluru) मैदानात रंगणार आहे. शनिवारी 12 मार्च पासून बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सामन्यात 100 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना एन्ट्री मिळणार आहे. पिंक बॉल टेस्टसाठी याआधी प्रेक्षक क्षमतेच्या 5 टक्के चाहत्यांना एन्ट्री देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (100 Spectators Allowed Day Nnight Test Bengaluru India vs Sri Lanka)

आता कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने (KSCA) यात बदल केला. 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिल्यानंतर तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात झाली. वाढती मागणी पाहून राज्य क्रिकेट असोसिएशनने 100 टक्के प्रेक्षक क्षमतेसह कसोटी सामना खेळवण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनेही याला परवानगी दिली आहे.

2 वर्षानंतर स्टेडियम पूर्ण क्षमतेनं भरणार

कोरोनाच्या संकटामुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला. क्रिकेटला काही काळ ब्रेक लागला. खेळ सुरु झाल्यानंतर 100 टक्के प्रेक्षकांसह सामना खेळवण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे. बंगळुरुमध्ये 2018 नंतर एकही टेस्ट झालेली नाही. याशिवाय 2020 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना रंगलेला नाही. त्यामुळे डे नाइट कसोटी सामन्यात प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळेल.

पिंक बॉल टेस्ट आणि मिशन क्लीन स्वीप

मोहालीच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत विजय नोंदवला होता. बंगळुरुच्या मैदानात रोहित अँण्ड कंपनी टेस्ट सीरीजमध्ये प्रतिस्पर्ध्यांना क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघा चौथी आणि घरच्या मैदानातील तिसरा दिवस रात्र कसोटी सामना खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT