Graham Thrope And Joe Root
Graham Thrope And Joe Root Sakal
क्रीडा

इंग्लंडला धक्का, हेड कोचपाठोपाठ आणखी एकाने टाकला 'पेपर'

सुशांत जाधव

इंग्लंड क्रिकेट संघ (England Cricket Team) सध्या संघर्ष करताना दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना चांगलाच फटका बसला. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) इंग्लंडला 4-0 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवण्या पराभवानंतर खेळाडूंसह संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शुक्रवारी सकाळी इंग्लंड संघाचे मुख्य कोच क्रिस सिल्वरवुड (Chris Silverwood) यांनी राजीनामा दिला. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. इंग्लंडचे सहाय्यक कोच ग्राहम थोर्प (Graham Thrope) यांनीही संघाची साथ सोडली आहे.

इंग्लंड संघाचे इन्टर्म मॅनेजिंग डायरेक्टर अँड्रू स्ट्रोस यांनी ग्राहम थोर्प यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार मानले आहेत. इंग्लंड संघासोबत अनेक वर्षे काम केल्याबद्दल धन्यवाद. भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत त्यांनी सहाय्यक कोचला निरोप दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्राहम थोर्प म्हणाले की, इंग्लंड संघातील खेळाडू आणि कोच यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं माझं भाग्य समजतो. संघातील खेळाडू आणि कोचसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील. याआधी इंग्लंडचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाइल्स आणि मुख्य कोच क्रिस सिल्वरवुड यांनी राजीनामा दिला होता.

अ‍ॅशेस मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे. ते अजूनही कायम असल्याचे दिसते. क्रिस सिल्वरवुड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. कसोटीमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर क्रिस सिल्वरवुड यांना कोचपदी कायम राहण्याची इच्छा होती. पण चारीबाजूंनी दबाव वाढल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT