Afghanistan Cricket Team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: अफगाणिस्तानने प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या 58 धावांत गुंडाळलं अन् विजयासह 'हा' मोठा विक्रमही केला नावावर

Afghanistan vs Uganda: अफगाणिस्तानने टी20 वर्ल्ड कप 2024 मधील मोहिमेची सुरुवात विक्रमी विजय मिळवत केली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, Afghanistan vs Uganda: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पाचवा सामना अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा संघात पार पडला. गयानाला झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 125 धावांनी विजय मिळवला. यासह या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील धावांच्या तुलनेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच टी20 वर्ल्ड कपमधील हा एकूण चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठे विजय (धावांच्या तुलनेत)

  • 172 धावा - श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग, 2007

  • 130 धावा - अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह, 2021

  • 130 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलड, द ओव्हल, 2009

  • 125 धावा - अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा, गयाना, 2024

  • 116 धावा - इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, कोलंबो, 2012

अफगाणिस्तानचा विजय

या सामन्यात अफगाणिस्तानने युगांडासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडा संघ 16 षटकातच अवघ्या 58 धावांवर सर्वबाद झाले. त्यांनी फक्त 18 धावांतच 5 विकेट्स गमावल्या होत्या.

युगांडाकडून फक्त रियाझत अली शाह आणि रॉबिन्सन ओबुया यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. रियाझतने 11 धावा केल्या, तर रॉबिन्सनने 14 धावा केल्या. तसेच चार खेळाडू शुन्यावरच बाद झाले.

अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत फझलहक फारुकीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात केवळ 9 धावा देत या 5 विकेट्स घेतल्या. तसेच नवीन-उल-हक आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी सुरुवातीलाच आक्रमण केले. रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान या सलामीवीरांनी अर्धशतके केली.

गुरबाजने 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली, तर झाद्रानने 46 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 70 धावांची खेळी केली. मात्र नंतर नजीबुल्लाह झाद्रान (2), गुलबदिन नायब (4) आणि अझमतुल्लाह ओमरझाई (5) हे स्वस्तात बाद झाले.

मोहम्मद नबी 14 धावांवर नाहात राहिला, तर राशिद २ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानने 20 षटकात 5 बाद 183 धावा उभारल्या.

युगांडाकडून कॉसमॉस कयेवूटा आणि ब्रायन मसाबा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर अल्पशे राजमानीने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT