Russell-Run-Out 
क्रिकेट वर्ल्ड कप

Video: अजब गजब रन आऊट... रसल झाला हैराण; तुम्हीही एकदा पाहाच

T20 WC WI vs BAN: तस्कीन अहमदने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला अन्...

विराज भागवत

T20 WC WI vs BAN: तस्कीन अहमदने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला अन्...

BAN vs WI, T20 World Cup 2021: बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात विंडिजने शेवटच्या क्षणाला विजय मिळवत स्पर्धेतील पहिला विजय साजरा केला. विंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १४२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाला केवळ १३९ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, या सामन्यात आंद्रे रसलच्या अजब गजब रन आऊटची चांगलीच चर्चा रंगली.

प्रथम फलंदाजी करताना विंडिजच्या संघाची सुरूवात सुमार झाली. ख्रिस गेल, एव्हिन लुईस, शिमरॉन हेटमायर, ड्वेन ब्राव्हो या साऱ्यांनी निराशा केली. कर्णधार पोलार्डदेखील रिटायर्ड हर्ट झाला. निकोलस पूरनच्या ४० आणि रॉस्टन चेसच्या ३९ धावांच्या बळावर विंडिजने १४२ धावांपर्यंत मजल मारली. आंद्रे रसलकडून फटकेबाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्याच्या डावाचा फारच विचित्र अंत झाला. रसल नॉन स्ट्राईकला उभा असताना गोलंदाजाने चेंडू टाकला. फलंदाजाने तो चेंडू मारला असता चेंडू गोलंदाजाच्या पायाला लागला आणि स्टंपवर जाऊन लागला. त्यामुळे एकही चेंडू न खेळता आंद्रे रसलला माघारी जावं लागलं.

पाहा व्हिडीओ-

१४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या डावाची सुरुवात थोडीशी अडखळती झाली. लिटन दासने एकहाती डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ४४ धावांवर असताना त्याला माघारी धाडण्यात विंडिजला यश आलं. त्यानंतर महमदुल्लाहने डाव पुढे नेला. मोहम्मद नईम, साकीब अल हसन, सौम्या सरकार, मुश्फीकूर रहिम या साऱ्यांनी निराशा केली. पण महमदुल्ला शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला. पण अखेर त्याचे प्रयत्न ३ धावांनी तोकडे पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT