क्रिकेट वर्ल्ड कप

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया नवव्यांदा खेळणार फायनल; जाणून घ्या किती फायनल्स खेळल्या अन् जिंकल्या?

दक्षिण अफ्रिकेचा तीन विकेट्सनं पराभव करत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Cricket World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं दक्षिण अफ्रिकेवर ३ विकेट्सनं विजय मिळवला. त्यामुळं ऑस्ट्रेलिया दुसरी फायनलिस्ट टीम ठरली आहे. भारतानं यापूर्वीच न्यूझीलंडला पराभूत करत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही फानयल खास असणार आहे. कारण नवव्यांदा हा संघ फायनल खेळणार आहे. (Cricket World Cup 2023 Australia will play final for ninth time team India is ready to defend)

वीस वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची भारतला संधी

ऑस्ट्रेलिया नऊ वेळा फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा त्यांना भारताचा सामना करायचा आहे. यावेळी फायनलचे हे दोन्ही संघ प्रचंड फॉर्मात आहेत. त्यामुळं कोण विश्वचषक जिंकेल याबाबत नेमकं काही भाकितं करणंही अवघड आहे. पण 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्याची संधी भारताला आहे. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियानं किती फायनल्स खेळल्या अन् जिंकल्या?

1975 - उपविजेता

1987 - चॅम्पियन्स

1996 - उपविजेता

1999 - चॅम्पियन्स

2003 - चॅम्पियन्स

2007 - चॅम्पियन्स

2015 - चॅम्पियन्स

2019 - सेमीफायनल

2023 - फायनलमध्ये दाखल

जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार फायनल

आता १९ नोव्हेंबर २०२३ रोजी गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडणार आहे. त्यामुळं भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरोधात या स्टेडियमवर भिडणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या स्टेडियमची आसन क्षमता १ लाखांहून अधिक आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT