IND-vs-PAK 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND VS PAK: सामन्याआधी 'दादाचं' महत्त्वाचं विधान

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने भारतात आयोजित करणं कठीण? गांगुलीने सांगितलं कारण

दीनानाथ परब

दुबई: उद्या टी२० वर्ल्डकपमध्ये (T20 world cup) भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs pak) सामना होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची दोन देशातीलच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुक्ता असते. मागच्या काही वर्षात वर्ल्डकप व्यतिरिक्त दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामनेच (cricket matches) झालेले नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतात दोन्ही देशांचे क्रिकेट सामने आयोजित करणं का कठीण आहे? त्याचं कारण सांगितलं आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. त्यातुलनेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे क्रिकेट सामने आयोजित करणं सोपं आहे, असं मत गांगुली यांनी व्यक्त केलं आहे. आयसीसी जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला विराट कोहली पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकप स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून विराटची ही शेवटची स्पर्धा असेल. कारण टी२० क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद त्याने सोडले आहे.

"भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने वर्ल्डकपची सुरुवात होण्याची ही पहिली वेळ नाहीय. २०१५ च्या वर्ल्डकपची सुरुवातही पाकिस्तान विरुद्ध सामन्याने झाली होती" असे गांगुलीने सलाम क्रिकेट २०२१ मध्ये सांगतिले. "हे असं घडत असतं. कारण या सामन्यात प्रचंड रस आहे. या सामन्याचे आयोजन करणे कठीण नाही. मी जेव्हा खेळत होतो, तेव्हा मला कधी हा कठीण सामना वाटला नाही" असे गांगुली म्हणाला.

"भारत-पाकिस्तान सामन्याचा एक वेगळा दबाव असतो, असं लोक म्हणतात. पण मला तसं कधी जाणवलं नाही. मी कॅबचा अध्यक्ष झाल्यानंतर २०१६ मध्ये इडन गार्डनवर भारत-पाकिस्तान सामना झाला. प्रशासक म्हणून माझ्यासाठी तो पहिला सामना होता" असे गांगुली म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT