IND vs BAN esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN : पांड्या अन् पंतचा दांडपट्टा; भारताचा सराव पक्का, बांगलादेशचा केला मोठा पराभव

T20 World Cup 2024 : भारतीय संघाने आज दमदार सराव करून घेतला. विराट वगळता संघातील सर्व प्रमुख खेळाडूंनी आपला फॉर्म तपासून पाहिला.

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 IND vs BAN : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या एकमेव सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. भारताने ठेवलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 122 धावाच करता आल्या.

गोलंदाजीत अर्शदीप सिंग, शिवम दुबे यांनी चांगला मारा केला. तर फलंदाजीत ऋषभ पंतने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्या देखील फॉर्ममध्ये आला असून त्याने 23 चेंडूत 40 धावा चोपल्या. त्याने 4 षटकार अन् 2 चौकार मारले.

नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या भारताने आपले कॉम्बिनेशन सेट करण्याच्या दृष्टीने अनेक पर्याय चाचपून पाहिले. रोहित शर्माने ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवत एक प्रयोग केला. हा प्रयोग जवळापस 500 पेक्षा जास्त दिवसांनंतर भारतीय जर्सी घालून मैदानावर उतरणाऱ्या ऋषभ पंतने सार्थ ठरवला.

त्यानं 32 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. अर्धशतकानंतर पंत रिटायर झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने डावा पुढे नेला. पांड्याने तर तुफान फटकेबाजी करत आयपीएलमधला पांड्या वेगळा अन् टीम इंडियाकडून खेळतानाचा हार्दिक पांड्या वेगळा असतो हे जणू सिद्धच करून दाखवलं.

त्यानं आपल्या 40 धावांच्या खेळीत 32 धावा या चार षटकार आणि दोन चौकार मारत वसून केल्या. सूर्यकुमार यादवनं 18 चेंडूत 31 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकात 5 बाद 182 धावांपर्यंत मजल मारू शकला.

यानंतर गोलंदाजीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच आपली ताकद दाखवून दिली. अर्शदीपनं 2 तर सिराजनं एक शिकार करत बांगलादेशची अवस्था 3 बाद 10 धावा अशी करून टाकली.

त्यानंतर अक्षर पटेल अन् हार्दिक पांड्यानं बांगलादेशची मधली फळी कापत बांगलादेशचा निम्मा संघ 41 धावात गुंडाळला. मात्र यानंतर मोहम्मदुल्ला अन् शाकिब अल हसनने भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. अखेर बुमराहनं शाकिबची शिकार करत ही जोडी फोडली.

रोहित शर्माने आजच्या सामन्यात शिवम दुबेला देखील गोलंदाजी करण्याची संधी दिली. आयपीएलमध्ये गोलंदाजी न करणाऱ्या शिवम दुबेने आजच्या सामन्यात आपल्या कर्णधाराला नाराज केलं नाही.

चेंडू अडकून येणाऱ्या खेळपट्टीवर शिवमने 3 षटकात 4.30 च्या सरासरीने फक्त 13 धावा देत 2 बळी देखील टिपले. आजच्या सामन्यात संजू सॅमसन आणि फलंदाजीत शिवम दुबे सोडला तर सर्व खेळाडूंनी चांगला सराव करून घेतला.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT