Afghanistan vs Scotland
Afghanistan vs Scotland T 20 World Cup Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : मुजीबचा पंजा अन् राशिदचा चौकार, अफगाणचा मोठा विजय

सुशांत जाधव

T20 World Cup 2021, Afghanistan vs Scotland : शारजाच्या मैदानातील सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानने मोठा विजय नोंदवला. पहिल्यांदा बॅटिंग करताना अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 190 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलंडच्या फलंदाजांची अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी अक्षरक्षा गिरकीच घेतली. मुजीब उर रहमानने प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला. राशिद खानने 4 तर नवीन उल हकला 1 विकेट मिळाली. स्कॉटलंडचा संघ 10. 2 षटकात अवघ्या 60 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानने सलामीच्या सामन्यात 130 धावांनी विजय मिळवला आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर हझरतुल्लाह झझाईने 30 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 44 धावांची जबरदस्त खेळी केली. मोहम्मद शहजादसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. गुरबझनेही आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. त्याने 37 चेंडूत 1 चौकार आणि 4 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 37 चेंडूत 46घ धावा कुटल्या. नजीबुल्लाहनेही चौकार षटकारांची आतषबाजी केली. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या.

अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना जॉर्ज मुन्से आणि कर्णधार कायले कोएत्झर यांनी स्कॉटलंडच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 28 धावा असताना कायले कोएत्झर 10 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मॅकलोएड, बेरिंग्टंन आणि मॅथ्यू क्रॉस यांना खातेही उघडता आले नाही. राशिद खानने व्हेलला शून्यावर बाद केले. स्कॉटलंडचे 5 गडी शून्यावर बाद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT