IND-vs-PAK 
क्रिकेट वर्ल्ड कप

भारतीय क्रिकेटबद्दल पाक बोर्डाच्या अध्यक्षांचं मोठं विधान

विराज भागवत

वाचा नक्की काय म्हणाले, PCB अध्यक्ष रमीझ राजा...

T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा वगळता इतर वेळेस क्रिकेट सामने झालेले नाहीत. कोरोनाकाळात पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारताशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू खेळले जायला हवेत असं मत मांडलं. भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्सने या ऑफरला फारशी किंमत दिली नाही. पण आता मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ind vs pak

"आशियाई क्रिकेट संघटनेने सोमवारी स्पष्ट केले आहे की २०२३ सप्टेंबरला पाकिस्तानात होणारा आशिय चषक ५० षटकांच्या वन डे सामन्यांचा असेल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. पाकिस्तान नक्कीच आशिया चषकाचे यशस्वी आयोजन करण्याचे प्रयोजन करेल. ती स्पर्धा उत्तम रितीने आयोजित केली जाईल याची मला खात्री आहे. मी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना विनंती केली की राजकारण बाजूला ठेवून खेळ जसा आहे तसा सुरू ठेवायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधले संबंध तरी नक्कीच सुधारले जायला हवेत. भारत-पाक क्रिकेटला पूर्ववत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतील यात वादच नाही. पण आमच्यात चांगली चर्चा झाल्याने भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतील", असा विश्वास रमीझ राजाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exam 2026: ‘सीईटी’चे प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर,पाहा कोणत्या दिवशी कोणती परीक्षा?

लग्नाच्या काही तास आधी अपघात, मुहूर्त चुकू नये रुग्णालयातच लग्नाचा निर्णय; कसा पार पडला सोहळा? पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : छावा संघटनेचे विजय घाडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या गालावर लागली सांगलीची हळद, फार्म हाऊसमधील लग्नाचे शाही व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं...

गडकरी साहेब पैसे पडून आहेत तर काम का होत नाही? नवले पुलावर स्थानिकांनी केला NHAIचा दशक्रियाविधी

SCROLL FOR NEXT