Shaheen-Shah-Afridi-Shoaib-Akhtar 
क्रिकेट वर्ल्ड कप

आफ्रिदीचे दोन वेगवान चेंडू अन् टीम इंडिया उद्ध्वस्त- अख्तर

IND vs PAK: शाहीन आफ्रिदीचा 'चित्ता' या नावाने केला गौरव; भारताविरूद्ध घेतले तीन महत्त्वाचे बळी

विराज भागवत

IND vs PAK: शाहीन आफ्रिदीचा 'चित्ता' या नावाने केला गौरव

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाला टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताविरूद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. भारताने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर कशीबशी १५१ धावांपर्यंत मजल मारली होती. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मात्र दहा गडी राखून भारताचा पराभव केला. शाहीन शाह आफ्रिदीने दोन इनस्विंग चेंडूंवर भारताच्या दोन तगड्या सलामीवीरांना बाद केलं आणि त्या धक्क्यातून भारतीय संघ हवा तसा सावरूच शकला नाही. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीची रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने तोंडभरून स्तुती केली.

"शाहीन शाह आफ्रिदी... अप्रतिम कामगिरी. चित्त्याच्या वेगाने गोलंदाजी करत तू दमदार पराक्रम करून दाखवलास. आफ्रिदीच्या दोन वेगवान गोलंदाजीपुढे भारताचा संघ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्याची स्पेल खरंच अप्रतिम होती. भारतीय गोलंदाजांनी आता थोडा विचार करायला हवा. कारण तुम्ही विरोधी संघाचा एकही गडी बाद करू शकलेला नाहीत. अशा वेळी तुम्ही स्वत:ला काय म्हणाल, याचा स्वत:च एकदा विचार करा. सध्याचा पाकिस्तानचा संघ कोणत्याही संघाला पराभवाचं पाणी पाजू शकतो", असा विश्वास पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने यू ट्युबवरील व्हिडीओ दरम्यान व्यक्त केला.

पाहा शोएब अख्तरचा व्हिडीओ-

दरम्यान, भारतीय संघाने टॉस गमावल्यानंतर सामन्यातही टीम इंडियाची गडबडच उडाली. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. सूर्यकुमार यादवही पटकन बाद झाला. विराट कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांच्या झुंजार खेळीमुळे भारताचा संघ १५१ धावांपर्यंत पोहोचला. पण पाकिस्तानसाठी हे आव्हान फार कठीण गेलं नाही. रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ तर बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या आणि पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT