Asghar Afghan Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC : धोनीचा विक्रम मोडणारा पाक विरुद्धच्या पराभवानं खचला

इयॉन मॉर्गनकडे त्याच्यासह धोनीचा विक्रम मागे टाकण्याची संधी

सुशांत जाधव

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार अशघर अफगान याने नामिबिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. अखेरचा सामना खेळणाऱ्या अशघर अफगानला नामिबियाच्या खेळाडूंनीही गार्ड ऑफ ऑनर दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात त्याने 23 चेंडूत 32 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रुबेन ट्रम्पलमॅनच्या गोलंदाजीवर अतरंगी फटका मारताना तो झेलबाद झाला.

विकेट पडल्यानंतर अशघरअफगान ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना सहकाऱ्यांसह प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी उभे राहून त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला. सामन्यानंतर असगरने प्रसारमाध्यमांशी बोलताना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु असताना अचानक घेतलेल्या निर्णयामागचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला की, युवा खेळाडूंना संधी मिळाली या उद्देशाने हा निर्णय घेतला. अनेक लोकांनी स्पर्धा पूर्ण करुन हा निर्णय घ्यावा असा सल्ला दिला होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर हा निर्णय घेण योग्य होत, असे त्याने म्हटले आहे. अविस्मरणीय आठवणी सोबत घेऊन क्रिकेटला अलविदा करत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अशघरअफगानने अफगाणिस्तानकडून 6 कसोटी,114 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे त्याच्या खात्यात 440, 2424 आणि 1382 धावा जमा आहेत. यात दोन शतकासह 19 अर्धशतकांचाही समावेश आहे. असगर अफगान सध्याच्या घडीला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. यावर्षीच त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या 41 विजयाचे रेकॉर्ड मोडीत काढले होते. असगर अफगानच्या नेतृत्वाखाली अफगानिस्तान संघाने 52 टी 20 सामन्यात 42 विजय नोंदवले आहेत.

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन असगर अफगानचे रेकॉर्ड मागे टाकू शकतो. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने 40 टी-20 सामन्यात विजय नोंदवला आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेतच मॉर्गन धोनीसह अफगानचा विक्रम मागे टाकू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT