Kagiso Rabada  sakal media
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : षटकार देण्याची आणि विकेट घेण्याची रबाडाची हॅट््ट्रिक

इंग्लंडचा विजयासाठी अखेरच्या षटकांत १४ धावांची गरज होती, रबाडाने पहिल्या तीन चेंडूत ख्रिस वोक्स इंग्लंड कर्णधार ऑईन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांना बाद करून हॅट््ट्रिक केली

सकाळ वृत्तसेवा

शारजा : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला असला तरी अंतिम सरासरीत मागे पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, पण या सामन्यात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या सामन्यात अंतिम षटकात गोलंदाजी करत असताना रबाडाने पहिल्या तीन चेंडूंवर हॅट््ट्रिक केली. हॅट््ट्रिक करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील चौथा गोलंदाज ठरला.

दक्षिण आफ्रिकेच्या १९० धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडचा विजयासाठी अखेरच्या षटकांत १४ धावांची गरज होती, रबाडाने पहिल्या तीन चेंडूत ख्रिस वोक्स इंग्लंड कर्णधार ऑईन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांना बाद करून हॅट््ट्रिक केली. ब्रेट ली (वि. बांगलादेश), कर्टिस कॅफर (वि. नेदलँडस) आणि वानिंदू हासरंगा (वि. दक्षिण आफ्रिका) यांनी ट्वेन्टी-२० विश्वकरंडरक स्पर्धेत हॅट्ट्रिक केलेली आहे.२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ब्रेट लीगने पहिली हॅट््ट्रिक केली होती. त्यानंतरच्या तिन्ही हॅट््ट्रिक यंदाच्या स्पर्धेत झाल्या आहेत.

ट्वेन्टी-२० प्रकारात हॅट्ट्रिक करणारा रबाडा एकूण २५ वा गोलंदाज आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून पहिला. एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० प्रकारात दक्षिण आफ्रिकेच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.इंग्लंडला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना हॅट््ट्रिक करणाऱ्या रबाडाने या षटकांत तीनच धावा दिल्या, परंतु सामन्यातील त्याची एकूण कामगिरी ४८ धावांत ३ बळी अशी झाली. रबाडाने हे यश मिळवण्याच्या अगोदर त्याच्या एका षटकांत लिव्हिंगस्टोनने सलग तीन षटकार मारून षटकारांची हॅट््ट्रिक केली होती.

दृष्टिक्षेपात...

  • एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात हॅट््ट्रिक करणारा रबाडा पहिला गोलंदाज

  • अखेरच्या षटकात ख्रिस वोक्स, ऑईन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन यांना केले बाद

  • ट्वेन्टी-२० प्रकारात एकूण २५ वी हॅट््ट्रिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT