T20 World Cup 2024 Oman vs Scotland  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : सुपर-8चे समीकरण झालं रंजक! इंग्लंड जवळपास वर्ल्ड कपमधून बाहेर... ऑस्ट्रेलियालाही बसला मोठा धक्का

T20 World Cup 2024 Oman vs Scotland : टी-20 वर्ल्ड कपच 2024मध्ये सुपर-8चे समीकरण आता रंजक होताना दिसत आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Oman vs Scotland : टी-20 वर्ल्ड कपच 2024मध्ये सुपर-8चे समीकरण आता रंजक होताना दिसत आहे. वर्ल्ड कपचा 20 वा सामना स्कॉटलंड आणि ओमान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने शानदार विजयाची नोंद केली. ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 7 गडी गमावून 150 धावा केल्या.

पाठलाग करताना स्कॉटलंडने केवळ 13.1 षटकांत ही धावसंख्या गाठली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने 61 धावांची खेळी केली. या पराभवानंतर ओमानही स्पर्धेतून बाहेर पडला. आणि स्कॉटलंडच्या या विजयानंतर इंग्लंडचा संघ पण जवळपास बाहेर गेला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमानची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर नसीम खुशी तिसऱ्या षटकात 9 चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. कर्णधार आकिब इलियास वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात तो पॅव्हेलियनमध्ये परतला. आकिबने 6 चेंडूत 16 धावांची खेळी खेळली. झीशान मकसूद 3 धावा करून स्वस्तात बाद झाला तर अशाप्रकारे ओमानने 100 धावांतच 4 विकेट गमावल्या.

मात्र, सलामीवीर प्रतीक आठवले एका टोकाला उभा होता आणि त्याला अयान खानची साथ मिळाली. दोघांनी धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. प्रतीक आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला आणि 40 चेंडूत 54 धावा केल्यानंतर 16 व्या षटकात तो आऊट झाला. त्यानंतर अयानने 39 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामुळे संघाला 150 धावांपर्यंत मजल मारता आली. स्कॉटलंडकडून सफायान शरीफने सर्वाधिक दोन बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा सलामीवीर मायकेल जोन्स 16 धावा करून स्वस्तात बाद झाला पण त्याचा साथीदार जॉर्ज मुनसेने आक्रमक फलंदाजी करत ब्रँडन मॅकमुलेनच्या साथीने 29 चेंडूत 65 धावा जोडून आपल्या संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मुनसेने 20 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मॅकमुलनने गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 31 चेंडूत नाबाद 61 धावा करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता.

ब गटात इंग्लंडचा मार्ग झाला कठीण

ओमानविरुद्धच्या विजयानंतर स्कॉटलंडचे 3 सामन्यांत 5 गुण झाले असून त्यांचा नेट रन रेटही चांगला आहे. अशा प्रकारे संघ ब गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर ऑस्ट्रेलिया 2 सामन्यात 2 विजयांसह 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

त्याचवेळी नामिबिया 2 सामन्यांनंतर 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ 2 सामन्यांत 1 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. जोस बटलरच्या संघाचा सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण दिसत आहे, कारण त्याला आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT