Eng-vs-NZ-Semifinal-1 
क्रिकेट वर्ल्ड कप

Semifinal 1: इंग्लंड अन् न्यूझीलंड.. T20 मध्ये कोण भारी?

T20 WC ENG vs NZ: पाहा आकडेवारी काय सांगते...

विराज भागवत

T20 WC ENG vs NZ: पाहा आकडेवारी काय सांगते...

ENG vs NZ, T20 World Cup: भारतीय संघ सोमवारी टी२० विश्वचषकातील आपला शेवटचा सामना खेळला. त्या आधीच भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर गेला होता. पण नामिबिया विरूद्ध विजय मिळवून त्यांनी स्पर्धेचा शेवट गोड केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा तो शेवटचा सामना होता. त्यांना भारताने विजयी निरोप दिला. पण न्यूझीलंडच्या संघाने भारताला स्पर्धेबाहेर केले. ब गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर आज न्यूझीलंडचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना आहे. या सामन्याआधी पाहूया टी२० मध्ये कशी आहे या दोन संघांची एकमेकांविरोधातील कामगिरी...

ENG vs NZ - पाहा आकडेवारी

इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपल्या साखळी फेरीत ५ पैकी ४ सामने जिंकून पुढच्या फेरीत दाखल झाले. या दोघांनी एकमेकांविरोधात टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण २० सामने खेळले आहेत. त्यापैकी १३ वेळा इंग्लंड तर ७ वेळा न्यूझीलंडचा संघ विजयी झाला आहे. इंग्लंडने १३ पैकी ६ वेळा प्रथम फलंदाजी करताना तर ७ वेळा आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. न्यूझीलंडनेदेखील प्रथम फलंदाजी करताना ६ वेळा विजय मिळवला आहे, पण आव्हानाचा पाठलाग करताना मात्र त्यांना केवळ एकाच सामन्यात यश आले आहे. याव्यतिरिक्त, टी२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ ५ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ३ वेळा इंग्लंड तर २ वेळा न्यूझीलंड विजयी झाले आहे.

दरम्यान, न्यूझीलंडच्या संघातील सलामीवीर मार्टीन गप्टील याला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. पण तो तंदुरूस्त होऊन संघात परतला. इंग्लंडला मात्र शेवटच्या साखळी सामन्यात मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर जेसन रॉय दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. त्याच्याजागी त्याच्याच तोडीचा सलामीवीर संघात घेण्याचा विचार इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने बोलून दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Case : अयानने रिल्ससाठी वापरलेल्या दोन पिस्टल नेमक्या कुणाच्या? समोर आली धक्कादायक माहिती...

Pune Fraud News : विवाहविषयक संकेतस्थळावर तोतया शास्त्रज्ञाकडून महिलेची फसवणूक

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

SCROLL FOR NEXT