Virat-Kohli-Team-India 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20WC : "टीम इंडियात दोन गट! एक कोहलीचा अन् एक..."

एका बड्या क्रिकेटपटूचं खळबळजनक विधान | Shoaib Akhtar Controversial Statement

विराज भागवत

एका बड्या क्रिकेटपटूचं खळबळजनक विधान | Shoaib Akhtar Controversial Statement

2 Groups Team India: भारतीय संघ सध्या टी२० वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत भारताने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहली हा आपल्या पदावरून पायउतार होणार आहे. संघातील खेळाडू म्हणून तो कायम असणार आहे, पण टी२० संघाचे नेतृत्व मात्र तो करणार नाही. त्यामुळे विराट कोहली आणि टीम इंडिया टी२० वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. पण तसं घडताना दिसत नाही. तशातच, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने, टीम इंडियात फूट पडल्याचं विधान करत खळबळ माजवली आहे.

"भारतीय संघात दोन गट पडलेत हे मला स्पष्ट दिसतंय. एक गट हा कोहलीसोबत आहे. दुसरा गट हा कोहलीच्या विरोधात आहे. मी ही गोष्ट काही दिवसांपासून स्पष्टपणे पाहू शकतोय. हा संघ गटबाजीत विभागला गेलाय. मला कळत नाहीये की असं का होतंय, पण जे मला दिसतंय ते खरं आहे. कदाचित विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे म्हणून असं घडत असावं", असं शोएब अख्तर म्हणाला.

Virat Kohli Lead Team India

"विराटने काही निर्णय चुकीचे घेतले. त्यामुळे त्याचा खेळ रंगत नाहीये. विराट अतिशय चांगला आणि प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. न्यूझीलंडविरूद्ध भारतीय संघाने अतिशय वाईट क्रिकेट खेळलं. त्यावरून त्यांच्यावर टीका केलीच पाहिजे. त्यांचा सामना खेळण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता. नाणेफेक हारताच साऱ्यांचे खांदे उतरले आणि माना खाली गेल्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे", असंही अख्तरने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: सोलापुरात मुलांचा भन्नाट जुगाड! विहीर-कालव्यातच तयार केलं ‘नैसर्गिक वॉटर पार्क’

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT