Virat Kohli Lead Team India
Virat Kohli Lead Team India T20 World Cup
क्रिकेट वर्ल्ड कप

विराटमध्ये यशस्वी कर्णधार बनण्याचे गुणच नाहीत- पाक क्रिकेटर

विराज भागवत

ऑस्ट्रेलियातून विराट घरी परतला अन् रहाणेने भारताला जिंकवंल, असंही तो क्रिकेटर म्हणाला

Virat Kohli unsuccessful Captain: सध्या दुबईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले. भारताला पाकिस्तानने १० गडी राखून तर न्यूझीलंडने ८ गडी राखून पराभूत केले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका झाली. तशातच पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने थेट विराटवरच तोंडसुख घेतलं. विराट कोहली हा कर्णधारपद भूषवण्यासाठी असक्षम आहे, असं विधान त्याने केलं.

"विराट हा एक अयशस्वी कर्णधार आहे. त्यामागे खूप कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत संघ निवडताना चुका केल्या. ऑस्ट्रेलियात देखील विराट असेपर्यंत भारताचा संघ पराभूत होत होता. पण तो गेला आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मालिका जिंकली. विराट हा मोठा खेळाडू आहे यात दुमत नाही, पण त्याच्यात यशस्वी कर्णधार बनण्याचे गुण नाहीत. विराट कोहलीकडे आक्रमकता आहे. पण कर्णधार म्हणून निर्णयक्षमता असणंदेखील आवश्यक असतं. ते विराटकडे दिसत नाही", असं सडेतोड मत दानिश कनेरियाने व्यक्त केलं.

Virat-Kohli-Team-India

"विराटचं मला काही कळतंच नाही. तो RCB साठी सलामीवीर म्हणून खेळतो. IPL सुरू असताना तो सांगतो की मी वर्ल्ड कपमध्येही सलामीला येईन. पण जसा-जसा वर्ल्ड कप जवळ येतो तसा तो अचानक सांगतो की लोकेश राहुलला सलामीला पाठवण्यात येईल. मग या साऱ्या प्लॅनिंगमध्ये अचानक न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात इशान किशन कुठून आला? रोहित शर्मा संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे त्याला असं सांगणं की ट्रेंट बोल्ट त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी आहे", अशी टीका त्याने केली.

Danish Kaneria

"भारताचा असा विचार होता की आपण रोहित-राहुल ऐवजी अचानक इशान किशनला सलामीला पाठवलं तर न्यूझीलंड गोंधळून जाईल. पण खरं पाहता न्यूझीलंड आणि केन विल्यमसनकडे A,B,C असं सगळे प्लॅन होते. विल्यमसनने घेतलेले सारे निर्णय अचूक होते. त्यांचे सर्व खेळाडू अप्रतिम खेळले. भारताने रोहित-राहुलला सलामीला उतरवायला हवं होतं. इशानला तुम्ही नक्कीच खेळवणं अपेक्षित होतं, पण मी त्या जागी असतो तर मी इशानला हार्दिकच्या जागी संघात खेळवलं असतं", असंही दानिशने स्पष्ट केलं.

Team-India

रवी शास्त्री, MS धोनीबद्दल...

"रवी शास्त्री तर गायबच झाल्याचे दिसतात. त्यांना असं वाटतंय की माझा कार्यकाळ संपत आलाय. मला फार विचार करण्याची गरज नाही. वर्ल्ड कप मध्ये जे काही घडायचं ते घडू दे. धोनीला मी फारसा दोष देणार नाही. तो आताच संघासोबत जोडला गेला आहे", असंही दानिश कनेरियाने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT