Jadeja and Kohli
Jadeja and Kohli Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

... तर बॅग पॅक करुन घरी जाईन; जाडेजाचा मजेशीर रिप्लाय

सुशांत जाधव

भारतीय संघाने नेट रनरेटमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला मागे टाकले आहे. पण...

Ravindra Jadejas Epic Reply on If Afghanistan vs New Zealand Upcoming Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाने आवश्यक नेट रन रेटनं स्कॉटलंडला पराभूत केले. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सर्वोच्च कामगिरीचा नजराणा दाखवून स्कॉटलंडला अवघ्या 85 धावांत ऑल आउट केलं. अष्टपैलू रविंद्र जाडेजाने टी-20 तील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 15 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. शमीनेही तळाच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत तीन विकेट घेतल्या.

स्कॉटलंडने दिलेले 86 धावांचे आव्हान टीम इंडियाला अवघ्या 43 चेंडूत पार करायचे होते. रोहित आणि लोकेश राहुलच्या फटकेबाजीनंतर सूर्यानं षटकार खेचत 39 चेंडूतच टीम इंडियाचा विजय निश्चित केला. या विजयानंतर भारतीय संघाने नेट रनरेटमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला मागे टाकले आहे. अफगाणिस्तान पाठोपाठ स्कॉटलंड विरुद्धच्या सलग दुसऱ्या विजयानंतर टीम इंडिया सुपर 12 मधील दुसऱ्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे. पण भारतीय संघाचा स्पर्धेतील पुढचा प्रवास हा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील निकालावर अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय हा भारतीय संघाचे सेमीफायनलचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे.

यावरुनच एका पत्रकाराने सामन्यानंतर रविंद्र जाडेजाला प्रश्न विचारला होता. जर न्यूझीलंडने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना गमावला तर टीम इंडियाचं पुढचं नियोजन काय असेल? असा प्रश्न जड्डूला विचारण्यात आला. या प्रश्नावर जाडेजाने मनापासून आणि प्रामाणिक उत्तर देत पत्रकाराचीच शाळा घेतली. जर असे झाले तर सामान पॅक करुन घरी जाईन, असे मजेशीर उत्तर त्याने दिल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाला सलामीच्या सामन्यात पाकिस्तान संघाने पराभूत केले होते. वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पाक विरुद्ध भारतीय संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सुपर 12 च्या दुसऱ्या गटात पाकिस्तान संघाने सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंडने आपली दावेदारी भक्कम केली असून केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाला अफगाणिस्तानने दणका दिला तर टीम इंडियाचे सेमीफायनल तिकीट पक्के होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT