Mayank Yada sakal
Cricket

Mayank Yadav : मयंक यादवसोबत बीसीसीआयचा करार

BCCI's deal with Mayank Yadav: यंदाच्या आयपीएल मोसमात भारताला मयंक यादवच्या रूपात युवा वेगवान गोलंदाज लाभला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल मोसमात भारताला मयंक यादवच्या रूपात युवा वेगवान गोलंदाज लाभला. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचे प्रतिनिधित्व करताना मयंकने उल्लेखनीय कामगिरी केली.

यामुळे आता त्याच्यासोबत बीसीसीआय करार करणार आहे. इतर युवा गोलंदाजांसोबत तोही बीसीसीआयच्या छत्रछायेखाली येणार आहे, पण मागील चार आठवड्यांमध्ये त्याला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित लढतींना तो मुकणार आहे. प्ले-ऑफमध्ये खेळण्याची शक्यता आहे, पण सध्या तरी काहीच सांगता येणे कठीण आहे.

मयंक यादवच्या प्रभावी गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला करारबद्ध करणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये मयंक यादव हा उमरान मलिक, विदवाथ कावेरप्पा, वैशाख विजयकुमार, यश दयाल, आकाश दीप या युवा गोलंदाजांसमवेत सराव करताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atharva Sudame: “महिला प्रवाशांच्या प्रतिष्ठेला हानी…”; पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस, ही रील ठरली कारण

Latest Marathi News Live Update : महायुतीची कोल्‍हापुरात आज 'शंखनाद विजयाचा' सभा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

बिनविरोधसाठी खून, माघारीच्या शेवटच्या दिवशी राडा; मतदानाआधीच ६७ जण विजयी, भाजपचे सर्वाधिक

Pune Airport : प्रवाशांना दिलासा; पुणे विमानतळावर ‘ग्रीन चॅनेल’, ४० ते ५० मिनिटांची होणार बचत

MSRTC New Bus Pass Scheme: रोज बसने प्रवास करताय? मग MSRTC ची नवीन पास योजना जाणून घ्या, प्रवास होईल एकदमभारी!

SCROLL FOR NEXT