Vidyadhar Paradkar sakal
Cricket

Vidyadhar Paradkar Death: अजिंक्य रहाणे आणि झहीर खान यांना घडवणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षकाचे निधन

Vidyadhar Paradkar Death :

सकाळ डिजिटल टीम

Vidyadhar Paradkar : भारतीय क्रिकेट संघाला मोठ-मोठे खेळाडू देणारे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांचे निधन झालं आहे. यामुळे क्रिकेट विश्वाला चांगलाच धक्का बसला असून क्रिकेट विश्व शोकाकुल झालं आहे.

क्रिकेटपटूंमध्ये विद्याधर पराडकर हे विद्या सर म्हणून प्रचलित होते. ते 76 वर्षाचे होते. भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतले होते. भारतीय संघात निवड झाल्यानंतरही तो नेहमीच विद्या सरांची भेट घेत असे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजिंक्य रहाणे याने कशाप्रकारे सरांनी त्याची आजवर मदत केली याबद्दल सांगितले होते.

अजिंक्य रहाणे याच्यासोबतच विद्या सरांनी दिग्गज वेगवान गोलंदाज जाहीर खान याला देखील प्रशिक्षण दिले होते. जाहीर खान याने तर संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली होती.

एका कार्यक्रमांमध्ये बोलताना अजिंक्य रहाणे यांनी पराडकर सरांविषयी एक सुंदर किस्सा सांगितला होता, त्यावेळी विद्या सरांनी सचिन तेंडुलकरने भेट म्हणून दिलेली बॅट ही अजिंक्य रहाणे याला भेट दिली होती.

मी मुंबईमध्ये अंडर १५ आणि अंडर १७ स्तरावर खेळलो आणि धावा केल्या. त्यावेळी सरांनी सांगितले की, ज्या बॅट ने तू खेळाला आहेत हि बॅट सचिन तेंडुलकरने त्यांना भेट दिली होती. सरांनी त्यांना खेळाचा आदर करायचे नेहमी सांगितले होते असे अजिंक्य रहाणे सांगितले होते

आपल्या गुरूंना श्रद्धांजली देताना सोशल मीडियावर अजिंक्य रहाणे यांनी पोस्ट केली आहे. माझ्या लहानपणीचे क्रिकेट गुरु विद्याधर पराडकर सर यांचे निधन झाले आहे. ते स्वर्गवासी झाले आहेत. त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेट करिअरमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. माझी प्रार्थना यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. ओम शांती. असे अजिंक्य रहाणे ट्विट करून म्हणाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mali Violence: मालीमध्ये अल-कायदा आणि आयसिसचा दहशतवाद! ५ भारतीयांचे अपहरण अन्...; नेमकं काय घडलं?

'या' दिवशी बोहोल्यावर चढणार सुरज चव्हाण; कुठे आहे लग्न? उरलेत काहीच दिवस; समोर आली अपडेट

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Metro Station: बांधकाम झाल्यावर कळलं; मेट्रो स्टेनशनची उंची कमी! मग 'असं' केलं जुगाड

Latest Marathi News Live Update : सांगलीमध्ये तब्बल एक महिन्यानंतर बेदाणे सौद्यांना सुरुवात

SCROLL FOR NEXT