India vs Pakistan X/ICC
Cricket

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

India tour of Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने तयारीलाही सुरुवात केली आहे. पण तरी या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, यावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने म्हटले आहे की या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला यायचे नसेल, तर त्याचे योग्य कारण द्यायला हवे. त्याच्या म्हणण्यांनुसार आयसीसी स्पर्धेला नाकारल्याने संघाला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात.

सध्या अशी चर्चा आहे की भारतीय संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार नाही किंवा हायब्रिज मॉडेलचा वापर या स्पर्धेतही करण्यात येऊ शकतो.

अशात आयएएनएसशी बोलताना लतिफ म्हणाला, 'तुम्ही द्विपक्षिय मालिकेला नकार देऊ शकतो. पण आयसीसी स्पर्धेला नकार देणे कठीण आहे. जेव्हा आयसीसी काही योजना तयार करते, तेव्हा संघांना कुठे खेळायचे आहे, हे माहित असते.

'जसे पाकिस्तानला माहित होते की त्यांना वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जायचे आहे. त्यानुसारच क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी करत असतात.'

याशिवाय लतिफ असेही म्हणाले की 'आयसीसी स्पर्धा नाकारणे कठीण असते. १९९६ वर्ल्ड कपवेळी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेला जाण्यासाठी नकार दिलेला, तेव्हा संपूर्ण ग्रुपमध्ये बदल झाला आणि श्रीलंका चॅम्पियन झाले. अशी मोठी चूक होते.'

'जर भारत किंवा पाकिस्तानने त्यासाठी स्वाक्षरी केली आहे, तर त्यांना त्या स्पर्धेला जावे लागणार आहे. जर राजकीय स्थरावर काही परिस्थिती उद्भवली, तर तुम्हाला न येण्यासाठी योग्य कारण द्यावे लागेल. पाकिस्तान योग्य नाही वैगरे गोष्टी सांगून तुम्ही द्विपक्षीय मालिकेला नाही म्हणू शकता, पण माझ्यामते आयसीसी स्पर्धेला नाकारणे महागात पडू शकते.'

दरम्यान, आता भारतीय सरकार आणि बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर काही रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट तयार केला असून तो आयसीसीकडे पाठवला आहे.

या ड्राफ्टनुसार सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोरला होऊ शकतात. भारताचे सर्व सामने आणि अंतिम सामना लाहोरला होईल. पण आता अद्यापही आयसीसी किंवा बीसीसीआयची याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT