French Open Badminton Marathi News sakal
Cricket

French Open Badminton : सात्विक - चिराग जोडी उपांत्य फेरीत! सिंधूचे आव्हान संपुष्टात

French Open Badminton : सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीने पुरुषांच्या दुहेरीत शानदार कामगिरी करताना फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी विभागात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली....

सकाळ ऑनलाईन टीम

French Open Badminton : सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीने पुरुषांच्या दुहेरीत शानदार कामगिरी करताना फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी विभागात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधू हिला मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे तिचे या स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले.

चीनच्या चेन फेई हिने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे पी. व्ही. सिंधूसमोर कडवे आव्हान होते. पहिल्या गेममध्ये सिंधू हिने आपला खेळ उंचावला आणि २४-२२ अशी बाजी मारली. मात्र, त्यानंतर चेन हिने २१-१७, २१-१८ असे यश संपादन करीत या लढतीत विजय साकारला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. सिंधू हिचा एक तास व ३२ मिनिटांत पराभव झाला.

पी. व्ही. सिंधू - चेन फेई यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकषावर नजर टाकल्यास भारतीय खेळाडूकडे ६-५ अशी आघाडी होती. मात्र, सिंधू हिने चेन हिच्यावर अखेरचा विजय २०१९मध्ये जागतिक स्पर्धेत मिळवला होता. अखेरच्या दोन लढतींमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. या लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सिंधूचा कडवा संघर्ष तिच्याकडून मोडून काढण्यात आला.

विजयी वाटचाल

सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीला मागील तीन स्पर्धांमध्ये जेतेपदापासून दूर राहावे लागत आहे; पण उपविजेतेपद नसे थोडके. भारतीय जोडीने आपला धडाकेबाज फॉर्म फ्रेंच ओपन स्पर्धेतही कायम राखला. दोन्ही खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सुपाक जोमखोह - के. केदरेन या जोडीवर २१-१९, २१-१३ असा ४२ मिनिटांत विजय संपादन केला व पुढे वाटचाल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT