Gautam Gambhir Sakal
Cricket

Gautam Gambhir Coach: गौतम गंभीरचा कार्यकाळ किती असणार अन् सूत्र केव्हा हाती घेणार? जाणून घ्या अपडेट्स

Team India Coach: बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती केली असून आता तो पदभार कधी हाती घेणार आणि तो किती वर्षे या पदावर असणार जाणून घ्या.

Pranali Kodre

Gautam Gambhir Team India Coach: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. त्यामुळे आता त्याचा पुढचा वारसदार कोण असणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. अखेर ही जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे.

बीसीसीआयने मंगळवारी (९ जुलै) गौतम गंभीरला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की गंभीर प्रशिक्षकपदाची महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी सर्वाधिक पात्र आहे.

गंभीरने या पदासाठी अर्ज केल्यानंतर बीसीसीआयच्या सल्लागार समितीला मुलाखातही दिली होती. त्यानंतर सल्लागार समितीने गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.

गौतम गंभीरचा कार्यकाळ

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गंभीर २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून पदभार स्वीकारेल. या दौऱ्यात भारताला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत.

गंभीरला बीसीसीआयने साडेतीन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२७ पर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. गंभीर तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार आहे.

यशस्वी कारकिर्द

गौतम गंभीर मेंटॉर असताना नुकतेच आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकले होते. पण आता गंभीरने भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्याने त्याला कोलकाताच्या मेंटॉरपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

गंभीरने यापूर्वी कर्णधार म्हणून २०१२ आणि २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यातही गंभीरचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

गौतम गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत २४२ सामन्यांमध्ये १०३२४ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT