Team India Squad T20 World Cup 2024 Hardik Pandya News Marathi sakal
Cricket

Team India Squad T20 WC : कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय; हार्दिक पांड्या 'या' अटीवर खेळणार टी-20 वर्ल्डकप?

Team India Squad T20 World Cup 2024 Hardik Pandya : टी-20 वर्ल्ड कप संघात हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे.

Kiran Mahanavar

Hardik Pandya T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप संघात हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. हार्दिकला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर त्याला आयपीएलमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल. वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्माची निवड समितीसोबत बैठक झाली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. यानुसार हार्दिक पांड्याची निवड त्याच्या आयपीएलमधील गोलंदाजीवर अवलंबून आहे.

खरं तर, आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही. त्याने फलंदाजी करताना काही चांगल्या खेळी खेळल्या पण गोलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. फलंदाजी करताना त्याने 6 सामन्यात 26.20 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 145 होता.

तर गोलंदाजीत त्याने 6 सामन्यात फक्त 3 विकेट घेतल्या आहेत आणि 12 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. यावरून हार्दिक पांड्याची गोलंदाजी अगदी सामान्य असल्याचे दिसून येते.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक झाली.

या बैठकीत हार्दिक पंड्याने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून सलग षटके टाकली तरच त्याला टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकेल, असा निर्णय घेण्यात आला. वृत्तानुसार, दोन तास चाललेल्या बैठकीत हार्दिकला पुनरागमन करायचे असेल तर त्याला सतत गोलंदाजी करावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला.

आयपीएल 2024 नंतर भारताला लगेच टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. या कारणास्तव, आयपीएलमध्ये कामगिरी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूची टी-20 वर्ल्ड कप संघात निवड केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत यावेळी आयपीएलचे महत्त्व अधिक आहे. यावेळी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूसाठी अनेक दावेदार आहेत आणि त्यामुळे हार्दिक पांड्याला सातत्याने सुधारणा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT